Nobel Peace Prize: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न मोहिमेला नोबेल शांतता पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

या संस्थेने भूकबळी रोखण्यात मोठी भूमिका निभावली आहे.

नवी दिल्ली- यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न मोहिमेला (वर्ल्ड फूड प्रोग्राम) मिळाला आहे. 2020 चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. शुक्रवारी (दि.9) दुपारी 2.30 वाजता या स्वीडिश अ‍ॅकॅडमीने हा पुरस्कार जाहीर केला. या संस्थेने भूकबळी रोखण्यात मोठी भूमिका निभावली आहे.

जागतिक अन्न मोहीम ही भूकबळी संपवण्यासाठी आणि अन्न सुरक्षेसाठीची संयुक्त राष्ट्राची एक महत्त्वाची संस्था आहे. जगाच्या पाठीवर एखाद्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत गरजूंपर्यंत अन्न पोहोचवण्याचे काम या मोहिमे अंतर्गत केले जाते. विशेषतः गृहयुद्ध आणि नैसर्गिक आपत्तींवेळी ही मोहीम राबवली जाते. 

भारतातील जागतिक अन्न मोहीम आता थेट अन्न देण्याऐवजी भारत सरकारला तांत्रिक सहाय्य आणि क्षमता निर्माण सेवा देते. जागतिक अन्न मोहीम निश्चित लोकसंख्येपर्यंत अन्न-आधारित सामाजिक सुरक्षा कवच सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

हेही वाचा- दक्षिण चिनी समुद्रातील चीनच्या हालचालींवर नाटोचे लक्ष हवे

यंदा या पुरस्कारासाठी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, रशियाचे अलेक्स नवलनी  आणि कोरोना विषाणूविरोधात लढण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारी जागतिक आरोग्य संघटना यांच्या नावाची चर्चा होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nobel Committee awards the Nobel Peace Prize 2020 to the World Food Programme