esakal | आर्मेनियाच्या पंतप्रधानांची पत्नी अझरबैजानशी थेट सीमेवर लढणार; मुलगासुद्धा शस्त्रसज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

armenia prime minister s wife anna hakobyan on battle ground

अर्मेनियन लष्कराच्या साथीत सीमेवर सज्ज होण्यास आपण आतुर झालो असल्याचे अॅना यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले. आमची मायभूमी तसेच स्वाभिमान शत्रूसमोर गुडघे टेकणार नाही, अशा शब्दांत त्यांनी जिगर व्यक्त केली.

आर्मेनियाच्या पंतप्रधानांची पत्नी अझरबैजानशी थेट सीमेवर लढणार; मुलगासुद्धा शस्त्रसज्ज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येरेवान (अर्मेनिया) - नागोर्नो काराबाख या फुटीर प्रांतात झडलेल्या संघर्षात अझरबैजानविरुद्ध अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशीनीयन यांच्या पत्नी अॅना हकोबीयन लवकरच उभ्या ठाकणार आहेत. त्यासाठी त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे.

अॅना ४२ वर्षांच्या असून १३ महिलांच्या तुकडीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षणानंतर त्या लष्करी सराव करतील. त्यानंतर त्यांना सीमेवर तैनात केले जाईल. गेल्याच महिन्यात काराबाखमधील महिलांच्या या तुकडीचे प्रशिक्षण पार पडले. एका लष्करी तळावर त्यांना धडे गिरवण्यासाठी घाम गाळावा लागला. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा कसा वापरायचा याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले.

आता अर्मेनियन लष्कराच्या साथीत सीमेवर सज्ज होण्यास आपण आतुर झालो असल्याचे अॅना यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले. आमची मायभूमी तसेच स्वाभिमान शत्रूसमोर गुडघे टेकणार नाही, अशा शब्दांत त्यांनी जिगर व्यक्त केली. या दोन देशांत गेल्या महिन्यात सुरू झालेल्या संघर्षात दोन्ही बाजूचे हजारो नागरिक मारले गेले आहेत. रशिया आणि अमेरिकेच्या वेगवेगळ्या प्रयत्नांसह तीन वेळा शस्त्रसंधीचे करार झाले, पण संघर्ष अद्याप थांबलेला नाही, तसेच तणावही निवळलेला नाही.

हे वाचा - राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी दंगल उसळण्याची शक्यता; मार्क झुकरबर्गचा इशारा

पत्रकारीतेचाही पैलू
अॅना या पत्रकार आहेत. अर्मेनियन टाईम्सच्या त्या मुख्य संपादिका आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अमेरिका, कॅनडा, फ्रान्ससह नऊ देशांच्या प्रमुखांच्या पत्नींना एक पत्र पाठविले. त्यात नागोर्नो काराबाखच्या जनतेवर अझरबैजानने हल्ला केला आहे. या प्रांताच्या स्वातंत्र्याला मान्यता द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

पुरुषांना आवाहन
अॅना यांनी फेसबुकच्या माध्यमातून अर्मेनियाच्या पुरुषांना लष्करी आघाडीवर धाव घेण्याचे आवाहन केले. अर्मेनियाच्या प्रिय पुरुषांनो, तुम्ही सीमेवर जा आणि आपली मायभूमी, घरे, पत्नी, मूले व पालक यांचे रक्षण करण्यास अर्मेनियन पुरुष किती सक्षम आहेत हे जगाला दाखवून द्या, अशा शब्दांत त्यांनी साद घातली.

हे वाचा - रशियामध्येही चाकू हल्ल्याची घटना; 'अल्लाहू अकबर' ओरडत पोलिसाला भोसकले

चिरंजीवही शस्त्रांसह सज्ज
अॅना-निकोल यांचा मुलगा अशोत हा सुद्धा या संघर्षात शस्त्रांसह सज्ज झाला आहे. तो २० वर्षांचा आहे. अनिवार्य असे लष्करी प्रशिक्षण त्याने नुकतेच पूर्ण केले. 
 

loading image