कॅप्टन अमरिंदर यांच्याशी मैत्रीबाबत पाकिस्तानी महिला पत्रकाराचा खुलासा

कॅप्टन अमरिंदर यांच्याशी मैत्रीबाबत पाकिस्तानी महिला पत्रकाराचा खुलासा
Summary

मी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना २००६ मध्ये भेटले तेव्हा मी ५० वर्षांची होते आणि ते ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असं पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलम यांनी सांगितले.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पाकिस्तानी पत्रकार अरुसा आलम यांच्याशी असलेल्या मैत्रीवरून राजकारण तापलं आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अरुसा आलम यांच्यासोबतच्या मैत्रीला इतरांनी वेगळा रंग दिल्याचं म्हणत संकुचित वृत्तीचे लोक असं करत असल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यांनी देशातील नेत्यांशी ओळख होती असं सांगत सोनिया गांधी, सुषमा स्वराज, यशवंत सिन्हा यांच्यासोबत अरुसा आलम यांचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान आता या प्रकरणी अरुसा आलम यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली आहे. त्यात म्हटलं की, मी खूप नशीबवान आहे की अमरिंदर सिंग यांनी पूर्ण जगात मला त्यांचा मित्र म्हणून निवडलं. आमचे विचार आणि बुद्ध्यांक हा समान पातळीवर आहे.

अरुसा यांच्यावर विरोधकांकडून आयएसआय एजंट असल्याचे आरोप केले गेले. त्याबाबत अरुसा म्हणाल्या की, मला खूप वाईट वाटतं, मी नाराज आहे. गेल्या १६ वर्षांपासून भारतात येते. दर वर्षी मला एक वर्षचा व्हिसा ड्यू क्लिअरन्स नंतर मिळायचा. आरोप करणाऱ्यांना वाटतं की, रॉचेसुद्धा आय़एसआयसोबत संबंध आहेत. तुमची गुप्तचर संस्था, केंद्रीय सुरक्षा संस्था, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार, काँग्रेसचे युपीए सरकार, ते सगळे आयएसआयच्या पेरोलवर होते का? त्यांनीच तर मला व्हिसा दिला होता.

कॅप्टन अमरिंदर यांच्याशी मैत्रीबाबत पाकिस्तानी महिला पत्रकाराचा खुलासा
सुषमा स्वराज ते सोनिया गांधींचे ISI सोबत संबंध? अमरिंदर सिंग यांचा सवाल

आपल्यावर करण्यात येणारे आरोप हे तथ्यहिन असल्याचं अरुसा आलम यांनी म्हटलं. त्या म्हणाल्या की, मला आरोपांची पर्वा नाही. मी माझ्या आयुष्यात अशा ठिकाणी पोहोचलेय जिथं मला या गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही. मात्र त्यांच्या राजकारणाची पातळी पाहा. तुम्ही किती खालची पातळी गाठू शकता असा सवाल त्यांनी केला. तसंच जाऊन लोकांसाठी काम करा. तुम्ही सरकारमध्ये आहात तर मला यात का घेताय? कॅप्टन अमरिंदर सिंग यांना १८ कलमी कार्यक्रम लागू करण्यात आलेलं अपयश आणि इतर कारणांमुळे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदापासून हटवलं. मात्र यामागे त्यांना हटवणे एवढाच उद्देश दिसत होता असा आरोपही अरुसा यांनी केला.

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीने अरुसा आलम यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप केला. याला प्रत्युत्तर देताना अरुसा आलम यांनी म्हटलं की, हे खूपच वाईट आरोप आहेत. त्या म्हणतात की मी पळून गेले. मी पळून गेले नाही तर माझा व्हिसा संपल्यानं पाकिस्तानला परतले होते. आता मी माझ्या घरी इस्लामाबादमध्ये आहे. उलट नवज्योत कौर सिद्धू यांच्याच हाती ६० निर्दोष व्यक्तींचे रक्त लागले आहे असा आरोप अरुसा यांनी केला. २०१८ मध्ये अमृतसरमध्ये दसऱ्याला रेल्वे दुर्घटना झाली होती. यात ६२ निरपराध लोकांनी जीव गमावला होता.

कॅप्टन अमरिंदर यांच्याशी मैत्रीबाबत पाकिस्तानी महिला पत्रकाराचा खुलासा
50 एअर होस्टेस पोहोचल्या भरचौकात अन् त्यांनी कपडेच उतरवायला सुरुवात केली

कॅप्टन अमरिंदर यांच्यासोबत असलेल्या मैत्रीबद्दल बोलताना अरुसा यांनी सांगितलं की, आमचे विचार आणि बुद्ध्याक समान असे आहेत. जेव्हा मी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना २००६ मध्ये भेटले तेव्हा मी ५० वर्षांची होते आणि ते ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे. जर याला तुम्ही प्रेम वगैरे नाव देत असाल आणि रोमँटिंक अँगल द्यायचा प्रयत्न करत असाल तर ते चुकीचं आहे. मी नशिबवान आहे की, जगात त्यांनी मला मित्र म्हणून निवडलं. ही एक पवित्र आणि सुंदर अशी मैत्री आहे. मला त्यांचे जेवण करण्याचे कौशल्य आवडते आणि त्यांनाही माध्या काही गोष्टी आवडतात. ज्यात लेखन वगैरे आहे. यामुळेच आम्ही इतक्या वर्षात एकमेकांचे चांगले मित्र बनलो.

अरुसा आलम म्हणाल्या की, मी भारतात असते तेव्हा फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्या कुटुंबाला भेटते. मॅडम महाराणी साहिबा (प्रणित कौर) यांच्याशिवाय मी सगळ्यांना भेटते. ते माझे कौटुंबिक मित्र आहेत. मला भारतात फिरण्याची आवड होती आणि मी माझ्या अनेक मित्रांसोबत फिरत होत. कॅप्टन यांच्याशी अनेकदा भेट व्हायची. त्यामुळे नेहमीच व्हिसासाठी त्यांची स्पॉन्सरशिप घेत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com