यूएन प्रमुखांची आशियाई नेत्यांना साद; उठाव मागे घेतला जावा म्हणून एकत्रित कृतीचे आवाहन

वृत्तसंस्था
Wednesday, 10 February 2021

युएन सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीच यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले की,आम्ही म्यानमारमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत.आम्ही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संपर्क साधत आहोत

जीनिव्हा (स्वित्झर्लंड) - म्यानमारमधील उठाव मागे घेतला जावा म्हणून आता आशियामधील नेत्यांची एकत्रित कृती करावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी केले आहे.

त्या देशातील परिस्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. द्वीपक्षीय पातळीवर आशियाई देशांनी पुढाकार घ्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. गेल्या आठवड्यात लष्कराने अघोषित नेत्या आँग सान स्यू की यांच्यासह अनेक नेत्यांना स्थानबद्ध केले. तेथे एका वर्षासाठी आणीबाणी जाहीर झाली आहे, पण दिवसागणिक जनतेचा विरोध तीव्र त आहे.

युएन सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीच यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही म्यानमारमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नेत्यांशी संपर्क साधत आहोत. 

हे वाचा - Video: पोलिसांनी केलेल्या बेदम धुलाईचा व्हिडीओ झाला व्हायरल; 2 महिन्यांनी केलं सस्पेंड

विशेष दुताची मदत
म्यानमारसाठी गुटेरेस यांनी विशेष दूत म्हणून ख्रिस्तीन श्रानेर बर्गनर यांची नियुक्ती केली आहे. त्याच्या साथीत आंतरराष्ट्रीय समुदायाला एक आणण्याचे प्रयत्न कायम ठेवले जातील. युएन नागरी संघटनांच्याही संपर्कात असून अशा संघटना, पत्रकार आणि माध्यम कर्मचारी यांच्यावर घालण्यात आलेले निर्बंध चिंताजनक असल्याचे दुजारीच यांनी नमूद केले.

हे वाचा - नवरीचा व्हायरल व्हिडिओ तर ट्रेलर होता; पिक्चर अभी बाकी है!

मानवी हक्क परिषदेचे शुक्रवारी विशेष अधिवेशन
मानवी हक्क परिषद येत्या शुक्रवारी (ता. ११) म्यानमारमधील पेचाबाबत विशेष अधिवेशन घेईल. जनतेने निवडलेले सरकार लष्कराने पाडल्याबद्दल त्यात चर्चा अपेक्षित आहे. हे अधिवेशन लवकर घेण्यासाठी ब्रिटन तसेच युरोपीय महासंघाने सोमवारी विनंती केली. त्यास ४७ पैकी १९ सदस्य देशांनी पाठिंबा दिला. यात युरोपीय देशांसह जपान आणि दक्षिण कोरिया यांचाही समावेश होता. अधिवेशनातील ठरावाच्या मसुद्दाबाबत चर्चा सुरु आहे.

अमेरिकेचा समावेश
या निर्णयास पाठिंबा असलेल्या २८ निरीक्षक देशांमध्ये अमेरिकेचाही समावेश आहे. अमेरिकेने या संघटनेचा जून २०१८ मध्ये राजीनामा दिला होता. आता आपण पुन्हा सहभागी होत असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asian leaders of UN chiefs myanmar politics military