
आम्हाला तुमचा अभिमान म्हणत, पाकिस्तानकडून भारताच्या एअर-इंडियाचे कौतुक करण्यात आले आहे. एअर इंडियाला पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून (एटीसी) एक अनपेक्षितरित्या ही कौतुकाची थाप मिळाली आहे. एअर इंडियाचे विशेष विमान भारतातून फ्रँकफर्टला जात होते. सर्व खंडांमध्ये कोरोना पसरल्यामुळे हे विमान भारतात अडकलेल्या युरोपातील नागरिकांना मायदेशी घेऊन जात होते, यावेळी पाकने भारताचे स्वागत करत कौतुक केले आहे.
नवी दिल्ली : आम्हाला तुमचा अभिमान म्हणत, पाकिस्तानकडून भारताच्या एअर-इंडियाचे कौतुक करण्यात आले आहे. एअर इंडियाला पाकिस्तानच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून (एटीसी) एक अनपेक्षितरित्या ही कौतुकाची थाप मिळाली आहे. एअर इंडियाचे विशेष विमान भारतातून फ्रँकफर्टला जात होते. सर्व खंडांमध्ये कोरोना पसरल्यामुळे हे विमान भारतात अडकलेल्या युरोपातील नागरिकांना मायदेशी घेऊन जात होते, यावेळी पाकने भारताचे स्वागत करत कौतुक केले आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
फ्रँकफर्टला जाणाऱ्या विशेष विमानाच्या एका कॅप्टनने, "हा माझ्या आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी अभिमानाच क्षण होता. जेव्हा पाकिस्तानी एटीसीने युरोपमधील आमच्या विशेष विमान संचालनाचे कौतुक", असे सांगितले. वरिष्ठ पाकिस्तानच्या फ्लाइट इन्फॉर्मेशन रीझनमध्ये (एफआयआर) प्रवेश करताच पाकिस्तानी एटीसीने एअर इंडियाचे 'असलम अलैकुम'ने स्वागत केले.
Coronavirus : पंतप्रधान मोदी साधणार विरोधी पक्षाच्या नेत्यांशी संवाद
भारतीय कॅप्टनने झालेल्या संभाषणाबाबत माहिती दिली. पाकिस्तान एटीसीने भारतीय वैमानिकांना,"तुम्ही फ्रँकफर्टला मदतकार्यासाठी जात आहात याची माहिती द्या", असे सांगितले. यावर एअर इंडियाच्या कॅप्टनने पाकिस्तानी हवाई क्षेत्राला 'हो, आम्ही फ्रँकफर्टला जात आहोत', असे सांगितले. यावर पाकिस्तानी एटीसीने एअर इंडियावर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले, 'आम्हाला अभिमान आहे की अशा जागतिक साथीच्या वेळी तुम्ही उड्डाणे करत आहात. शुभेच्छा. त्यानंतर भारताच्या नॅशनल एव्हिएशन सर्व्हिसच्या कॅप्टनने उत्तर दिले, "खूप खूप धन्यवाद".
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२५; कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण
जगातील सर्व देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे सर्व विदेशी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशातच एअर इंडिया देशात अडकलेल्या नागरिकांची मदत करत आहेत.