Julian Assange : असांज यांना प्रत्यार्पणाला आव्हान देता येणार

विकीलिक्सचे ज्युलियन असांज यांना लंडनमधील न्यायालयाने दिलासा देताना कथित हेरगिरी प्रकरणावरून त्यांच्या अमेरिकेतील प्रस्तावित प्रत्यार्पणाला आव्हान देण्याची परवानगी न्यायालयाने दिली.
Julian Assange
Julian Assangesakal
Updated on

लंडन : विकीलिक्सचे ज्युलियन असांज यांना लंडनमधील न्यायालयाने दिलासा देताना कथित हेरगिरी प्रकरणावरून त्यांच्या अमेरिकेतील प्रस्तावित प्रत्यार्पणाला आव्हान देण्याची परवानगी न्यायालयाने दिली.

मागील दशकभरापासून याच मुद्यावरून कायदेशीर लढाई सुरू होती. असांज हे ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहेत. इक्वेडोरच्या दूतावासातून त्यांना २०१९ मध्ये ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी लंडनच्या बेलमार्श येथील तुरुंगात करण्यात आली होती.

असांज यांनी विकीलिक्सच्या संकेतस्थळावर गोपनीय कागदपत्रे प्रसिद्ध करून हजारो लोकांचे प्राण धोक्यात घातले असल्याने त्यांच्यावर खटला चालविण्यात यावा यासाठी अमेरिका सरकार आग्रही होते. लंडनमध्ये खटला सुरूही झाला होता.

मृत्युदंडाला विरोध

अमेरिकेच्या राज्यघटनेतील पहिल्या सुधारणेला अनुसरून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याबरोबरच असांज यांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात येऊ नये अशी हमी दिली जावी म्हणून त्यांची कायदा सल्लागारविषयक टीम आग्रही होती. आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला अनुकूलता दर्शविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com