जपानमध्ये ॲस्ट्राझेनेका बनविणार तब्बल एवढ्या कोटी डोस

Astra-Zeneca
Astra-Zeneca

टोकियो - ॲस्ट्राझेनेका कंपनीने कोरोनावरील लसीचे जपानमध्ये ९ कोटी डोस बनविण्याचा निर्णय घेतला आहे. अस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी विकसित केलेल्या लसीचे १२ कोटी डोस जपान घेणार आहे. यातील नऊ कोटी डोस जपानमध्ये बनविले जातील, तर उर्वरित आयात केले जातील, असे वृत्तपत्र निक्केई दैनिकाने दिले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

AZD1222 असे नाव असलेल्या लसीची चाचणी गेल्या वर्षीच सुरु झाली. दाईची सॅनक्यो, जेसीआर फार्मास्युटिकल्स आणि इतर स्थानिक भागिदारांसह उत्पादन आणि वितरण केले जाणार आहे. लसीकरणाच्या मोहिमेला विलंब झाल्यामुळे जपानमध्ये पुरेसे डोस उपलब्ध होणार का अशी चिंता निर्माण झाली आहे.

पठ्ठ्यानं डेरिंग केली! बायकोच्या क्रेडिट कार्डवरून भरला चक्क गर्लफ्रेंडचा दंड!
 
अद्याप अर्ज नाही
जपानमधील नियामक संस्थेची मंजुरी मिळावी म्हणून ॲस्ट्राझेनेकाने अद्याप अर्ज केलेला नाही. वास्तविक फायझरपूर्वीच या कंपनीने स्थानिक चाचण्या सुरु केल्या आहेत. याविषयी प्रतिक्रिया विचारली असताना ॲस्ट्राझेनेका कंपनीकडून तातडीने प्रतिसाद मिळू शकला नाही.

म्हणून जपानमध्ये विलंब
जपानमध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस लसीकरण सुरु करण्याची योजना आहे. आर्थिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या इतर काही प्रमुख आर्थिक महासत्तांच्या तुलनेत जपान याबाबतीत पिछाडीवर आहे. याची दोन कारणे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे हा देश लसीसाठी परदेशी उप्तादक कंपन्यांवर अवलंबून आहे. याशिवाय लसीच्या वापरास मंजुरीसाठी स्थानिक चाचण्या अनिवार्य असण्याचीही अट जपानने ठेवली आहे.

ऑलिंपिकचा संदर्भ
जपान जुलैमध्ये टोकियोत ऑलिंपिक आयोजित करणार आहे. त्याआधी बहुतांश लोकसंख्येचे लसीकरण होणे गरजेचे आहे. सुविधांची जुळवाजुळव करण्यात काही मोठे अडथळे असल्यामुळे हे अवघड असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अॅस्ट्राझेनेकाची बेल्जियममध्ये तपासणी
ब्रुसेल्स - कोरोना लसीच्या उत्पादनातील अडचणींमुळे पुरवठ्यास विलंब होत आहे का याबाबत बेल्जियममधील अधिकाऱ्यांनी ॲस्ट्राझेनेका कंपनीच्या फॅक्टरीत तपासणी केली आहे. युरोपीय महासंघासाठी आठ कोटी डोस तीन कोटी १० लाख पर्यंत कमी करावे लागत असल्याचे या कंपनीने जाहीर केले. त्यानंतर या कंपनीशी २७ सदस्य देशांच्या शिखर संघटनेचा वाद होत आहे. त्यामुळे युरोपात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महासंघानेच बेल्जियम सरकारला तशी विनंती केली. इस्राईल किंवा ब्रिटन अशा देशांच्या तुलनेत लसीकरणाचा वेग कमी असल्यामुळे महासंघाच्या अधिकाऱ्यांवर दडपण येत आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com