बायकोच्या क्रेडिट कार्डवरून त्यानं भरला चक्क गर्लफ्रेंडचा दंड!

Relationship
Relationship

दुबई : 'पती पत्नी और वो' अशी प्रकरणं हल्ली नित्याचीच झाली आहेत. नवरा-बायकोच्या नात्यात आणखी कुणी तिसरा आला की खटके उडालेच म्हणून समजा. दुबईत एक असाच प्रसंग घडला आहे, त्याची सोशल मीडियात जोरदार चर्चा होत आहे. 

त्याचं झालं असं की, दुबईतील एका महिलेने तिचं क्रेडिट कार्ड हॅक केल्याची तक्रार पोलिसांना दिली. पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी केली त्यावेळी एक नवीनच प्रकरण समोर आलं आणि सर्वांनाच धक्का बसला. क्रेडिट कार्डवरून तिच्या नवऱ्यानेच पैसे भरल्याचे समजले, पण हे पैसे तिच्या नवऱ्याने गर्लफ्रेंडचा ट्रॅफिक दंड भरण्यासाठी खर्च केल्याचं कळताच तिचा पाराच चढला. 

सदर महिलेला क्रेडिट कार्डवरील व्यवहाराबाबत बँकेकडून एक मेसेज आला होता. तिने आपल्या कार्डवरून होणारे व्यवहार स्थगित करण्यासाठी बँकेशी संपर्क साधला आणि तिने क्रेडिट कार्डची चोरी झालं म्हणून पोलिसांत तक्रार नोंदवली. 

कोण्या दुसऱ्या महिलेने ट्रॅफिक दंड (फाइन) भरण्यासाठी सदर महिलेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान समोर आले. आपले कार्ड हॅक झाले नाही, हे समजल्याने तक्रारदार महिलेने सुटकेचा निश्वास सोडला. पण पुढं भलतंच काहीतरी वाढून ठेवलंय याची तिला पुसटशी कल्पनादेखील नव्हती. क्रेडिट कार्डवरून जिच्यासाठी दंड भरला गेला होता, तो आपल्याच नवऱ्याने भरला होता. आणि सदर महिला तिच्या नवऱ्याची गर्लफ्रेंड असल्याची शेवटी निष्पन्न झाले, आणि तिला चांगलाच धक्का बसला.

क्रेडिट कार्डवरून झालेल्या व्यवहाराचा मागोवा घेतला आणि ज्या व्यक्तीच्या नावे दंड भरला गेलाय त्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावण्यात आले. ज्यावेळी सायबर पोलिस सदर महिलेची चौकशी करत होते, तेव्हा तिला आपल्या मित्राचे लग्न झाले असून त्याच्या बायकोच्या क्रेडिट कार्डवरून ट्रॅफिक फाइन भरला आहे, याची कल्पना तिला नव्हती, अशी माहिती सायबर गुन्हे विभागाचे उपसंचालक कॅप्टन अब्दुल्ला अल शेही यांनी गल्फ न्यूजशी बोलताना दिली. 

नवऱ्यानेच गर्लफ्रेंडचा दंड भरला आणि त्याचा भुर्दंड बायकोला बसला. आपला मित्र विवाहित आहे, हे त्या दुसऱ्या महिलेला माहित नव्हतं. आणि आपल्या नवऱ्याची आणखी एक गर्लफ्रेंड आहे, हे सदर महिलेला माहित नव्हतं, असं हे विचित्र प्रकरण दुबईत उघडकीस आलं.

- जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com