लशीमुळे व्हॉलंटिअर आजारी पडला नव्हता; ऑक्सफर्डचा खुलासा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

इंग्लंडमधील चाचणीदरम्यान एका व्हॉलंटिअरमध्ये काही गंभीर लक्षणे दिसून आल्यावर 6 सप्टेंबर रोजी ही चाचणी थांबवण्यात आली होती.

लंडन - ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकासमवेत एस्ट्राझेनका ही कंपनी लसनिर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. भारतात सिरम इंस्टीट्यूट ऑक्सफर्डच्या 'कोविशिल्ड' लशीची निर्मिती करत आहे. दरम्यान, इंग्लंडमधील चाचणीदरम्यान एका व्हॉलिटिअरमध्ये काही गंभीर लक्षणे दिसून आल्यावर 6 सप्टेंबर रोजी ही चाचणी थांबवण्यात आली होती. 'ट्रान्सव्हर्स मायलिटिस' नावाचा दुर्मिळ असा पाठीचा त्रास संबंधित व्यक्तीमध्ये दिसून आला होता. 

चाचणीसाठी लस दिलेल्यांपैकी काही व्यक्तींवर अनपेक्षित परिणाम दिसून आल्यामुळे एस्ट्राझेनेका लसीची ट्रायल तातडीने थांबवण्यात आली होती. परंतु, हे अनपेक्षित परिणाम एस्ट्राझेनेका लसीमुळे झाले नसल्याचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने स्पष्ट केलं आहे. 

याबाबत जाहीर केलेल्या अहवालात असं म्हटलं आहे की, व्हॉलंटिअरच्या हातापायात अशक्तपणा जाणवत होता आणि संवेदनांमधील बदल झाल्याचं दिसायला लागल्यानंतर  ही चाचणी थांबवण्यात आली होती. त्यानंतर तातडीने व्हॉलंटिअरची तपासणी करून आढावा घेतला होता. 

हे वाचा - वीस दिवसांत तीन वेळा गोळीबार;अरुणाचलमध्येही चीनच्या कुरापती

दरम्यान, संशोधकांच्या असे लक्षात की, व्हॉलंटिअरमध्ये दिसून आलेल्या या आजाराच्या लक्षणांचा आणि लशीचा काहीही संबध नाही असं ऑक्सफर्डने जाहीर केलेल्या या अहवालात म्हटलं आहे.  या लशीची चाचणी पुन्हा एकदा ब्रिटन, ब्राझील, भारत आणि साऊथ अफ्रिकामध्ये सुरु करण्यात आली आहे. मात्र युनायटेड स्टेट्समध्ये मात्र अद्यापही चाचणी थांबवलेलीच आहे.

दुसऱ्या टप्प्यात 100 हून अधिक लोकांना ऑक्सफर्डची लस देण्यात आली होती. मात्र भारतात सहभागी उमेदवारांना कसल्याही प्रकाराची अनपेक्षित लक्षणे दिसून आलेली नव्हती. तरीही, भारतातसुद्घा या चाचणीला स्थगिती देण्यात आली होता. एस्ट्राझेनेका ऑक्सफर्ड कोरोना व्हायरस वॅक्सिन AZD1222 ची मानवी चाचणी पुन्हा सुरु केली आहे, अशी माहिती मेडिसिन हेल्थ रेग्युलेटरी ऑथॉरिटी (MHRA) यांनी दिलेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AstraZenecas trial illnesses not due to vaccine