...अन् २०० दिवसांनी डायपर घालून अंतराळवीर पृथ्वीवर परतले

Astronauts Return
Astronauts ReturnAstronauts Return
Updated on

अमेरिका : सुमारे सहा महिने अंतराळात घालवल्यानंतर सोमवारी रात्री चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले. ते त्यांच्या SpaceX कॅप्सूलमधून मेक्सिकोच्या आखातात उतरले. स्पेसएक्स क्रूचे चारही सदस्य स्पेस स्टेशन सोडल्यानंतर अवघ्या आठ तासांनी पृथ्वीवर सुखरूप परतले. खराब हवामानामुळे नासाने चार प्रवाशांचा परतीचा प्रवास सोमवार दुपारपर्यंत पुढे ढकलले होते. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरून जोरदार वारे वाहत असल्यामुळे सुरक्षित परतीचा धोका निर्माण झाला होता.

दोनशे दिवसांचा प्रवास पूर्ण करून पृथ्वीवर परतलेल्या प्रवाशांमध्ये नासाचे शेन क्रिम्बू, मेगन मॅकआर्थर, जपानचे अकिहिको होशिदे आणि फ्रान्सचे थॉमस पेस्केट यांचा समावेश आहे. चार अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतर आणखी चार प्रवाशांच्या अंतराळ प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. बुधवारी स्पेसएक्सवरून या चार प्रवाशांना स्पेस स्टेशनवर पाठवले जाईल. हे अंतराळवीर आधी रवाना होणार होते. परंतु, खराब हवामानामुळे आणि एक प्रवासी आजारी पडल्यामुळे प्रवास पुढे ढकलण्यात आला. आता बुधवारी त्यांची रवानगी करण्यात येणार आहे. हे प्रवासी सुमारे सहा महिने अंतराळ स्थानकातही राहतील.

Astronauts Return
किरीट सोमय्यांना धक्का; अतुल लोंढे यांनी दाखल केली याचिका

अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर परत येण्यासाठी सुमारे सात ते नऊ तास लागतात. नासा आणि स्पेसएक्सचे चार अंतराळवीर ड्रॅगन कॅप्सूलमधून पृथ्वीवर परतले. स्पेस स्टेशनचे सोलर पॅनेल ठीक करण्यासाठी चार वेळा स्पेसवॉक करण्यात आले. रशियन फिल्म क्रू स्पेस स्टेशनवर गेला आणि चित्रपट शूट केला. याशिवाय स्पेस स्टेशनवर पहिल्यांदा मिरचीची लागवड करण्यात आली.

टॉयलेट तुटल्याने घातला डायपर

प्रवाशांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर नेण्यासाठी आलेल्या स्पेसएक्स रॉकेटचे टॉयलेट तुटले. याच कारणामुळे अंतराळ स्थानक सोडल्यानंतर प्रवाशांना प्रवासात डायपर घालावे लागले. अंतराळवीरांना आठ तास डायपर घालावे लागले. हा आठ तासांचा प्रवास या चार अंतराळवीरांसाठी चांगला नव्हता. नासाच्या अंतराळवीर मेगन मॅकआर्थर यांनी या प्रवासाचे वर्णन भयानक असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com