अवकाशस्थानकावरून अवकाशवीर परतले

पीटीआय
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

रुबीन्स आणि ओनिशी यांची ही पहिलीच अवकाश मोहीम होती, तर इव्हानिशीन याने पाच वर्षांपूर्वी एका मोहिमेत भाग घेतला होता. अवकाशात गुणसूत्रांचा अभ्यास करण्यासाठी गेलेली रुबीन्स ही पहिली अवकाशवीर ठरली आहे. तिच्या मोहिमेतील सहभागामुळे या 115 दिवसांच्या मोहिमेबद्दल उत्सुकता होती

अस्ताना (कझाकस्तान) - आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील 115 दिवसांची मोहीम संपवून अमेरिका, जपान आणि रशियाचे अंतराळवीर पृथ्वीवर आज सुखरूप पोचले. केट रुबीन्स (अमेरिका), ऍनातोली इव्हानिशीन (रशिया) आणि ताकुया ओनिशी (जपान) हे तिघे अंतराळवीर सोयूझ या अवकाशयानातून कझाकस्तानमधील अवकाश केंद्रावर उतरले. रशियाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

रुबीन्स आणि ओनिशी यांची ही पहिलीच अवकाश मोहीम होती, तर इव्हानिशीन याने पाच वर्षांपूर्वी एका मोहिमेत भाग घेतला होता. अवकाशात गुणसूत्रांचा अभ्यास करण्यासाठी गेलेली रुबीन्स ही पहिली अवकाशवीर ठरली आहे. तिच्या मोहिमेतील सहभागामुळे या 115 दिवसांच्या मोहिमेबद्दल उत्सुकता होती. ऑगस्ट महिन्यात तिने उंदीर, व्हायरस आणि बॅक्‍टेरिया यांच्या गुणसूत्रांची यशस्वीपणे रचना केली होती. अवकाशातील या अभ्यासावरून अवकाश स्थानकात हानिकारक जंतू असल्यास ते ओळखून उपाय करणे सोपे जाणार आहे.
 

Web Title: astronauts return to mother earth

टॅग्स