China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

अनेक जखमी लोकांवर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.
China News
China NewsEsakal

बीजिंग : चीनमध्ये एक भीषण दुर्घटना घडला आहे. यामध्ये महामार्गाचा मोठा भाग कोसळला असून १९ जणांचा मृत्यू झाला आहेत तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. दक्षिण चीनमधील गुआंगडाँग प्रांतात बुधवारी ही घटना घडली. अल जझिराच्या हवाल्यानं एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (At least 19 killed dozens injured after highway collapses in southern China)

या वृत्तानुसार, मिझोऊ शहर आणि डाबू कन्ट्री केव दरम्यानच्या एस १२ महामार्गावरील १७.९ मीटर उंचावरील भाग बुधवारी पहाटे २.१० वाजता कोसळला. या महामार्गावरून वाहन सुरु असताना ही दुर्घटना घडल्यानं यामध्ये १८ वाहनं सापडली. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

China News
तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

दरम्यान, अल जझिराच्या माहितीनुसार या दुर्घटनेत १९ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून तर ३० लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे सर्वजण इमर्जन्सी केअर युनिटमध्ये उपचार घेत आहेत. पण ते सध्या धोक्याबाहेर आहेत. (Marathi Tajya Batmya)

China News
ICC: आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट किती शक्तीशाली आहे? नेतन्याहूंविरोधात अटक वॉरंट जारी केल्यास काय होणार?

या दुर्घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये स्थानिक न्यूज चॅनेल्सनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये आग लागल्यानंतरच्या ज्वाळा दिसत होत्या, तसेच धुरही दिसत होता. तसेच रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात कार कोसळताना दिसत होत्या. सध्या दुर्घटना झालेल्या ठिकाणी सुमारे ५०० लोक बचाव कार्यात काम करत आहेत. पण ही दुर्घटना का घडली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com