esakal | कोरोना हॉस्पिटलला भीषण आग; 52 लोकांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

 fire in Iraq

इराकमधील एका कोरोना हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याने 52 लोकांना मृत्यू झाला आहे, तर 67 जण जखमी झाले आहेत. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली

कोरोना हॉस्पिटलला भीषण आग; 52 लोकांचा मृत्यू

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

बगदाद- इराकमधील एका कोरोना हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याने 52 लोकांना मृत्यू झाला आहे, तर 67 जण जखमी झाले आहेत. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन टँकचा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. इराकच्या दक्षिणेकडील नासारिया शहरात ही घटना घडली. आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी याची माहिती दिली आहे. यासंदर्भात पंतप्रधान मुस्तफा अल-कधीमी यांनी वरिष्ठ मंत्रालयाची तातडीची बैठक बोलावली. त्यांनी नसारियाच्या आरोग्य व्यवस्थापकाचे निलंबन आणि अटक करण्याचे आदेश दिले आहेत. (At least 52 killed coronavirus hospital fire in Iraq)

ऑक्सिजनच्या टँकचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचं सांगण्यात आलंय. अनेक रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं आहे. पण, धुरामुळे काही वॉर्डमध्ये प्रवेश करण्यास अडचणी येत आहेत. हॉस्पिटल गार्डने सांगितल्यानुसार, त्याने सुरुवातीला एक मोठा आवाज ऐकला. त्यानंतर हळूहळू हॉस्पिटलला आग लागली. अनेकांना या आगीत आपला जीव गमवावा लागला आहे, अनेकांना वाचवण्यात यश आलं आहे.

हेही वाचा: आंतरजातीय विवाह करणाऱ्या नवदाम्पत्यांना आर्थिक साहाय्य

हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाचे निलंबन आणि अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. देशातील संघर्ष आणि निर्बंधांमुळे अडचणीत असलेल्या इराकला कोरोना महामारीचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत इराकमध्ये 17 हजार 592 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 14 लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातच हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीमुळे इराणच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा: सायबर क्राइम नियंत्रणासाठी पुणे पोलिसांची खास हेल्पलाईन

पोलिसांच्या माहितीनुसार मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण, अनेक रुग्ण सापडलेले नाहीत. रुग्णांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलबाहेर मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांसोबत त्यांचा संघर्ष झाला. यात दोन पोलीस गाड्यांचे नुकसान झाले आहे. Reuters ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात बगदादमध्ये ऑक्सिजन टँकचा स्फोट होऊन अशाच प्रकारची भीषण आग लागली होती. त्यात 82 रुग्णांना मृत्यू झाला होता, तर 110 लोक जखमी झाले होते.

loading image