'पर्यावरण' आणि 'विषमतेचा' मुद्दा केंद्रस्थानी

आमसभेत अनेक नेत्यांच्या भाषणातून हिंसाचारावर चिंता व्यक्त
'पर्यावरण' आणि 'विषमतेचा' मुद्दा केंद्रस्थानी
sakal

न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७६ व्या सत्रात आतापर्यंत झालेल्या भाषणांमध्ये पर्यावरण, वंशद्वेषातून वाढणारा हिंसाचार आणि जगाची होत असलेली विभागणी या मुद्द्यांवर नेत्यांनी अधिक जोर दिला. ‘यूएन’ सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी काल त्यांच्या भाषणात याच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत सर्व सदस्य देशांना सावध केले होते.

'पर्यावरण' आणि 'विषमतेचा' मुद्दा केंद्रस्थानी
राहुल, प्रियांकांकडे अनुभवच नाही : अमरिंदरसिंग

कोरोना संसर्गस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच राष्ट्रप्रमुखांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आमसभा होत आहे. या आमसभेसाठी जवळपास तीस राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत. आतापर्यंत अमेरिका, चीन, सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि इतर काही देशांच्या प्रमुखांची भाषणे झाली आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की,‘‘सध्याचा काळ बदलाचा आहे. कोरोनामुळे जग अडचणीत आले आहे.

त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी खांद्यावर घेत या संकटाचा धैर्याने सामना करावा.’’ अनेक देशांनी जागतिक पातळीवर विषमता असल्याची खंत व्यक्त केली. कोरोना व पर्यावरणासाठी जागतिक संकटांचा सामना करत असतानाही बड्या देशांनी एकी दाखविली नसल्याची नाराजी या देशांनी व्यक्त केली. वंशवादाच्या मुद्द्यावरील चर्चेत इस्राईलवर टीका होत असताना अमेरिका व इस्राईलच्या प्रतिनिधींनी निषेध म्हणून बैठकीतून बाहेर पडणे पसंद केले.

अमेरिका, चीनची स्वतंत्र धोरणे

पर्यावरणाच्या समस्येचा एकत्रित सामना करण्याचे आवाहन वारंवार केले गेले असताना आज अमेरिका आणि चीन या कार्बनचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या दोन देशांनी आपापली स्वतंत्र धोरणे जाहीर केली. कोळशाचा वापर असलेल्या विदेशातील कोणत्याही ऊर्जा प्रकल्पाला यापुढे अर्थसाह्य करणार नाही, असे

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जाहीर केले. या घोषणेच्या काही तास आधीचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी गरीब देशांना प्रोत्साहन म्हणून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत दुपटीने वाढ करून ती २०२४ पर्यंत ११ अब्ज ४० कोटी डॉलर करण्याचा निर्णय घेतला होता.

भूमिका आणि टीका

दक्षिण कोरिया : उत्तर कोरियाबरोबर शांतता प्रस्थापित करण्याची आमची तयारी.

कतार : तालिबान सरकारकडे जागतिक समुदायाने पाठ फिरवू नये

इराण : आमच्यावरील निर्बंध ही अमेरिकेच्या युद्धखोर वृत्तीचे प्रतिक

कोस्टा रिका : शस्त्रांपेक्षा, शांततेसाठी अधिक गुंतवणूक हवी

"इतर अनेक समस्यांबरोबरच लिंग समानतेच्या मुद्द्यावरही जगाने लक्ष द्यावे. जगभरात अनेक ठिकाणी महिला आणि मुलींना संधी आणि अधिकार नाकारले जातात. ही परिस्थिती बदलणे आवश्‍यक आहे. " - अब्दुल्ला शाहिद, अध्यक्ष, आमसभा (महिला राष्ट्रप्रमुखांच्या विशेष बैठकीत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com