इराणच्या संसदेवर दहशतवादी हल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

येथील संसद सदस्य असलेल्या इलियास हझराती यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन शस्त्रसज्ज हल्लेखोर संसदेमध्ये घुसले आहेत. दहशतवाद्यांकडून काही जणांना ओलिसही धरण्यात आले आहे. दरम्यान, संसदेमधील या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी इराणचे विशेष सुरक्षा पथकही घतनास्थळी दाखल झाले आहे

लंडन - इराणमधील संसद व या देशाचे दिवंगत धार्मिक नेते अयातोल्ला खोमेनी यांच्या स्मृतीस्थानावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढविल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

खोमेनी यांच्या स्मृतीस्थानाबाहेर एका आत्मघातकी दहशतवाद्याने स्फोट घडविल्याचे निष्पन्न झाले आहे. या हल्ल्यांमध्ये संसदेमधील एक सुरक्षा रक्षक ठार झाला आहे; तर इतर काही नागरिक जखमी झाले आहेत.

येथील संसद सदस्य असलेल्या इलियास हझराती यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन शस्त्रसज्ज हल्लेखोर संसदेमध्ये घुसले आहेत. दहशतवाद्यांकडून काही जणांना ओलिसही धरण्यात आले आहे. दरम्यान, संसदेमधील या हल्ल्याचा प्रतिकार करण्यासाठी इराणचे विशेष सुरक्षा पथकही घतनास्थळी दाखल झाले आहे.

इराणमधील अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. अद्यापी संघर्ष सुरु असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे.

Web Title: attack on Iran's parliament