
अफगाणिस्तानच्या जलालाबाद इथं मंगळवारी भारतीय दुतावासात हल्ला करण्यात आला. भारतीय दुतावासातील स्टाफवर हा हल्ला झाला. दुतावासातील गाडीला अज्ञातांच्या वाहनाने धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात कुणीही भारतीय कर्मचारी ठार झालेला नाही किंवा जखमीही झालेला नाही. लोकल स्टाफ वादूद खानच्या सुरक्षा रक्षकाचा या हल्ल्यात मृत्यू झालाय. जलालाबादमध्ये बंद पडलेल्या भारतीय दुतावासात अफगाणिस्तानच्या कर्मचाऱ्यांवर मंगळवारी अज्ञात शस्त्रधारी हल्लेखोरांनी हल्ला केला.