
वॉशिंग्टन - अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला असूनही तो स्वीकारण्यास नकार देणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी उद्दामपणाचे प्रदर्शन घडवत अमेरिकेच्या कॅपिटॉल इमारतीबरोबरच देशाच्या लोकशाहीवरही हल्ला केला. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षात चार जणांचा मृत्यू झाला. या संघर्षामुळे अध्यक्षीय निवडीवर शिक्कामोर्तब करण्याच्या घटनात्मक प्रक्रियेतही अडथळे आले.
अध्यक्षीय निवडणुकीत निवडून आलेल्या प्रतिनिधींची मते मोजून विजयी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत, म्हणजे कॅपिटॉल इमारतीमध्ये संयुक्त अधिवेशन बोलाविण्यात आले होते. ३ नोव्हेंबरला झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांनी विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३०६-२३२ अशा फरकाने सहज विजय मिळविला. या विजयावर आज औपचारिकतेची मोहोर लागली. मात्र, त्यापूर्वी ५३८ मतांपैकी केवळ १२ मतांवर मान्यतेची मोहोर लागली असतानाच त्याच अडथळा आला. पराभव झाला असूनही तो अमान्य करण्याचे धोरण स्वीकारलेल्या ट्रम्प यांच्या समर्थकांनी कालपासूनच वॉशिंग्टनमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ते गोंधळ घालतील, अशी शंका असल्याने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, पोलिसांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या समर्थकांनी थेट कॅपिटॉलची सुरक्षा यंत्रणा भेदून आत घुसखोरी करत तोडफोड केली. या धक्कादायक प्रकारामुळे मतमोजणी प्रक्रियेत अडथळा येऊन संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष माइक पेन्स आणि इतर सदस्यांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले. या समर्थकांचा पोलिसांबरोबरही संघर्ष झाला. या संघर्षात एका महिलेसह चौघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनेक जणांना अटकही केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.