'राफेल'चे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मे 2019

- पॅरिस शहरातील भारताचे 'राफेल' कार्यालय फोडण्याचा प्रयत्न.

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस शहरातील भारताच्या राफेल टीमचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न रविवारी रात्री करण्यात आला. याबाबत हवाई दलाने संरक्षण मंत्रालयाला माहिती दिली.

भारताने फ्रान्ससोबत 36 राफेल लढाऊ विमाने खरेदीचा करार केला. यासाठी फ्रान्समधील 'दसॉल्ट' या कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. फ्रान्समध्ये सुरु असलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या उत्पादनाचे काम पाहणे आणि त्याच्या प्रशिक्षणासाठी हवाई दलाची एक टीम पॅरिसमध्ये कार्यरत आहे.

दरम्यान, राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरुन देशभरात मोठा गदारोळ सुरु आहे. या विमानांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempted break of IAF Rafale Project Management Team office in Paris