

Australia Bondi Beach Firing Hero Video
ESakal
ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध बोंडी बीच गोळीबाराने गोंधळून गेला. न्यू साउथ वेल्स पोलिसांच्या म्हणण्यानुसार, किमान १० जणांचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन पोलिसांचा समावेश आहे. दोन बंदूकधार्यांनी गोळीबार केला. कारवाईदरम्यान एक हल्लेखोर जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. आता त्याच घटनेचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका नागरिकाने हल्लेखोराकडून बंदूक हिसकावून घेतली आणि त्याच्याकडे रोखली. त्यानंतर लोक त्याला हिरो म्हणत आहेत.