esakal | फेसबूक पोस्टमुळं मानहानी झाल्यास माध्यमं जबाबदार - ऑस्ट्रेलियन कोर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Facebook

फेसबूक पोस्टमुळं मानहानी झाल्यास माध्यमं जबाबदार - ऑस्ट्रेलियन कोर्ट

sakal_logo
By
सुधीर काकडे

माध्यमांनी (Media) तयार केलेल्या बातम्यांच्या फेसबूकपोस्टवर (Facebook) येणाऱ्या वेगवेळ्या कमेंट्ससाठी सदरील माध्यम समुह जबाबदार असू शकतात असे न्यायालयाने सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या उच्चन्यायालयाने नुकत्याच एका प्रकरणात केलेल्या टिपण्णीमुळे माध्यमसमुहांच्या चिंतेत वाढ झाली आहे. फेसबुक पेज तयार करून, त्यावर पोस्ट केलेल्या वेगवेगळ्य कंटेंटवर नेटकऱ्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रीयांसाठी सदरील कंटेंट पोस्ट करणारे पेज आणि माध्यमसमुह जबाबदार असणार आहे. ऑस्ट्रेलियामधील तीन माध्यमांवर झालेल्या आरोपप्रकरणात न्यायालयाने ही माहिती दिली आहे.

या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने असे नमुद केले की, एखाद्या पोस्टवर केलेली कमेंट ही सदरील समुहाद्वारे दुसऱ्या फेसबुक युजर पर्यंत पोहोचते, त्यामुळे फेसबुक पेज किंवा संबंधीत माध्यमसमुहच त्या कमेंटचा प्रकाशक असतो. कारण ती कमेंट दुसऱ्या फेसबूक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात त्या फेसबुक पेजची देखील महत्वाची भूमिका पार पाडते.

हेही वाचा: पत्रकारांनी 'दहशतवादी' म्हणणं बंद करावं, अन्यथा..

फेअर फॅक्स मीडिया पब्लीकेशन, नेशनवाईड न्युज आणि ऑस्ट्रेलियन न्युज प्रायव्हेट लीमीटेड या कंपन्यांनी डायलन वोलर नामक व्यक्तीच्या अटकेसंदर्भातील बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. या वृत्तसंस्थांच्या फेसबुक पेजवर आलेल्या कमेंट्समध्ये वोलर यांची बदनामी करणाऱ्या प्रतिक्रीया होत्या. या प्रतिक्रीयांसाठी वृत्तसंस्थांच्या फेसबूक पेजला जबाबदार धरत वोलर यांनी माध्यम समुहच आपल्या बदनामीसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला. या प्रकरणात आरोप करताना वोलर यांनी लावलेला तर्क न्यायालयाने मान्य केला.

loading image
go to top