Video: दोघे जण माझ्या मागे बसले आहेत...

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

दोघांचा विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. पण, कोरोना व्हायरसचा धसका किती आहे, हे पाहायला मिळते.

सिडनी (ऑस्ट्रेलिया) : दोघांचा विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. पण, कोरोना व्हायरसचा धसका किती आहे, हे पाहायला मिळते.

तिने फक्त एकदाच सांगावं माझ्यावर प्रेम नाही...

चीनमध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. जगभरामध्येही त्याची लागण होत असून, नागरिक हैरान झाले आहेत. या व्हायरसमुळे आतापर्यंत 2300 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर कोरोना व्हायरसला घाबरलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये कोरोनापासून वाचण्यासाठी चक्क स्वत:ला त्यानं प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून घेतले आहे.

ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानात एक प्रवासी चक्क कोरोना व्हायरसमुळे चेहऱ्याला मास्क लावून हातात हातमोजे आणि प्लास्टिकची हूड घालून बसला आहे. संबंधित व्हिडिओ अलिसा नावाच्या ट्विटर युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ अपलोड करताना अलिसाने लिहिले की, “दोघे जण माझ्या मागे विमानात बसले आहेत. कोरोना व्हायरसपासून घाबरून राहा”. संबंधित व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

पत्नीला प्रियकरासोबत पाहिले अन् पती म्हणाला चालू द्या...

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. शिवाय, विविध व्यवसायांवर परिणाम झाला असून, मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: australia passenger wrap themselves in plastic over to coronavirus