WHO च्या आधी भारताच्या कोव्हॅक्सिन लसीला ऑस्ट्रेलियाने दिली मान्यता

कोव्हॅक्सिन ही भारताची पहिली स्वदेशी कोविड प्रतिबंधक लस आहे.
Covaxin
CovaxinSakal

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाने (Australia) भारत बायोटेकने (Bharat Biotechs) विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन (Covaxin) लसीला (Vaccine) मान्यता दिली आहे. ऑस्ट्रेलियाने मान्यताप्राप्त लसींमध्ये कोव्हॅक्सिनचा समावेश केला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना आता ऑस्ट्रेलियात सहज प्रवेश मिळणार आहे. कोव्हॅक्सिन ही भारताची पहिली स्वदेशी कोविड प्रतिबंधक लस आहे.

मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाने सिरम इन्स्टिट्यूटने निर्मिती केलेल्या 'कोव्हिशिल्ड' लसीला मान्यता दिली होती. चीनच्या सिनोफार्मा कंपनीच्या लशीचाही मान्यताप्राप्त लसींमध्ये ऑस्ट्रेलियाने समावेश केला आहे. कोव्हॅक्सिन लस घेणारे १२ वर्ष व त्यापुढील वयोगटातील व्यक्ती ऑस्ट्रेलियात प्रवेश करु शकतात तसेच चीनच्या सिनोफार्मा कंपनीची लस घेणाऱ्या १८ ते ६० वयोगटातील व्यक्तींना ऑस्ट्रेलियात प्रवेशाची मुभा देण्यात आलीय.

Covaxin
'फोडा काय बॉम्ब फोडायचे, पण...', मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

या निर्णयामुळे शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात येणारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, व कुशल मनुष्यबळाचा ऑस्ट्रेलियात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लसीकरण न झालेल्या व्यक्तींना क्वारंटाइनमध्ये रहावे लागेल तसेच सर्व प्रवाशांचा कोविड-१९ रिपोर्ट निगेटिव्ह असला पाहिजे. जागतिक आरोग्य संघटना WHO ने अजून कोव्हॅक्सिनला मान्यता दिलेली नाही. मान्यता देण्याआधी WHO ने भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनबद्दल आणखी माहिती मागवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com