esakal | ऑस्ट्रेलियाच्या खासदाराने योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागितली मदत
sakal

बोलून बातमी शोधा

Yogi Adityanath

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असून दुसरी लाट ओसरली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळण्याची चर्चा आहे.

ऑस्ट्रेलियाच्या खासदाराने योगी आदित्यनाथांकडे मागितली मदत

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

कॅनबेरा- उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असून दुसरी लाट ओसरली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळण्याची चर्चा आहे. जवळपास 22 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कोरोना स्थिती हाताळणे एकप्रकारे आव्हान होते. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांचे देशातच नाही तर जगभरातूनही कौतुक होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचे एक खासदार तर योदी आदित्यनाथ यांच्या कामगिरीमुळे अत्यंत प्रभावित झाले आहेत. (Australian MP Craig Kelly seeks UP CM Yogi Adityanath help in tackling Covid)

ऑस्ट्रिलियाचे खासदार क्रेग केली यांनी योगी आदित्यनाथ यांचे कोरोना काळातील कामगिरीचे कौतुक केलं आहे. योगी आदित्यनाथ यांनी आयवरमेक्टिनचा वापर योग्य पद्धतीने केला, असं ते म्हणाले आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांचा व्हायरल लोड कमी करण्यासाठी आयवरमेक्टिन या औषधाचा वापर केला जातो. यासंदर्भात क्रेग केली यांनी ट्विट करुन योगी आदित्यनाथ यांनी उचललेल्या पाऊलांची प्रशंसा केली आहे.

हेही वाचा: शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीचं आमंत्रण नव्हतं - पटोले

क्रेग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, 'भारतीय राज्य उत्तर प्रदेश.. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमच्या येथे घेऊन येण्याचा पर्याय आहे का? जेणेकरुन आयवरमेक्टिनची समस्या नष्ट होईल'. क्रेग यांचे ट्विट अनेकांनी लाईक केले आहे. 10 जुलैपासून आतापर्यंत या ट्विटला 4.2 हजार लोकांनी रिट्विट केलं आहे. आणखी एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, 'कोरोना महामारीविरोधात चांगला पद्धतीने लढा दिल्याबद्दल भारतातील राज्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन. राज्य सरकारने आयवरमेक्टिनचा योग्य वापर केला.'

हेही वाचा: सौदी अरेबियात वापरात नसलेल्या दारुगोळ्याचा स्फोट

दरम्यान, उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत 59 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी 2,35,959 लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. गेल्या 24 तासांत 149 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 1489 सक्रिय रुग्ण आहेत.

loading image