esakal | सौदी अरेबियात वापरात नसलेल्या दारुगोळ्याचा स्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

Explosion

सौदी अरेबियात वापरात नसलेल्या दारुगोळ्याचा स्फोट

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

Saudi Arabia Explosion रियाध- सौदी अरेबियामध्ये वापरात नसलेल्या दारुगोळ्यात स्फोट झाला आहे. राजधानी रियाधच्या दक्षिणेला हा स्फोट झाला. सौदीतील सरकारी टीव्हीने यासंदर्भात माहिती दिली आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होत होता. ज्यात खर्ज परिसरातून धूर येत असल्याचं दिसत होतं. त्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात होते. (Saudi Arabia Explosion Reported At Unused Ammunition Dump Near Riyadh)

टीव्ही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, स्फोटामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. स्फोट एक अपघात असल्याचं सांगण्यात आलंय. खर्ज प्रिन्स सुलतान हवाईतळाच्या जवळच्या भागात आहे. याच ठिकाणी इराणसोबत लढण्यासाठी अमेरिकेचे सैन्य तैनात आहे. स्फोटाचा अमेरिकेच्या सैन्यावर कसलाही परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आलंय.

हेही वाचा: पाकिस्तानात बसमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट, चिनी इंजिनिअर्स ठार

वापरात नसलेल्या दारुगोळ्याचा सकाळी 5 च्या सुमारास स्फोट झाला. या भागातून मोठ्या प्रमाणात धूर येत होता आणि हा धूर संपूर्ण खर्ज शहरावर पसरला होता. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सरकारकडून यावर खुलासा करण्यात आला. स्फोटामुळे कसल्याची प्रकारचे नुकसान झाले नाही. तसेच यामागे कुणाचाही हात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: शेर बहादूर देऊबा नेपाळचे नवे पंतप्रधान; पाचव्यांदा घेतली शपथ

प्रिन्स सुलतान हवाई तळाच्या जवळच्या भागातच हा स्फोट झाला. याच ठिकाणी अमेरिकेचे जवळपास 2500 सैनिक आहेत. इराणविरोधातील लढण्यासाठी त्यांना याठिकाणी तैनात करण्यात आलंय. एअर फोर्स कॅप्टन रिचेल बुईट्रेगो यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितलं की, 'या स्फोटामुळे अमेरिकी सैन्याला कसलीही क्षती झालेली नाही. तसेच स्फोटानंतर काही मदत लागल्यास आम्ही करण्यास तयार आहोत.'

loading image