esakal | शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीचं आमंत्रण नव्हतं - पटोले
sakal

बोलून बातमी शोधा

शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीचं आमंत्रण नव्हतं - पटोले

शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीचं आमंत्रण नव्हतं - पटोले

sakal_logo
By
नामदेव कुंभार

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी झालेल्या काँग्रेस नेत्याच्या बैठकीला मला आमंत्रण नव्हती अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका ठरवण्यासाठी शरद पवार यांच्या घरी बैठक झाली आहे. बैठकीनंतर आमच्या नेत्याशी बोलल्यानंतर त्यांनी मला माहिती दिली असेही नाना पटोले म्हणाले. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या बैठकीला नाना पटोले उपस्थित नव्हते. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं होतं.

2014 प्रमाणे पुन्हा धोका मिळू नये म्हणून स्वबळाची तयारी सुरु केली आहे. पक्षश्रेष्ठीने दिलेली जबाबदारी मी प्रमाणिकपणे पार पाडत आहे. पार्टी आणि हायकमांड ही दोन्ही कामे वेगळी आहेत. भाजपावर दबाव निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याविरोधात मी काहीही चुकीचं बोललो नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. केंद्रातील मोदी सरकारविरोधात माझा रोष होता. काँग्रेस विस्ताराची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. मी हायकमांडच्या आदेशानं काम करणारा कार्यकर्ता आहे. 2024 मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात देशात काँग्रेसची सत्ता येईल, असेही पटोले म्हणाले.

हेही वाचा: नितीन राऊतांचे खाते पटोलेंना हवे?

फास बनवून फडणवीस यांनी अनेकांना अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. फडणवीसांनी बुहजन समाजाच्या नेत्यांचं नुकसान केलं आहे. त्यांच्या सरकारमध्ये एकनाथ खडसे यांचेही नुकसान झालं आहे.

हेही वाचा: काँग्रेसचे बडी नेतेमंडळी पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

loading image