संसदेत सिनेटरकडून बाळाला स्तनपान

वृत्तसंस्था
बुधवार, 10 मे 2017

माझी मुलगी आलिया हिचा मला खूप गर्व आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत स्तनपान करणारी ती पहिली लहान मुलगी ठरली आहे.

क्वीन्सलँड - संसदेत सिनेटरकडून बाळाला स्तनपान केल्याची घटना आपण कधी ऐकली नसेल, पण ऑस्ट्रेलियातील संसदेत असे घडले आहे. क्वीन्सलँडच्या सिनेवर लॅरिसा वॉटर्स या आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला कामकाज सुरु असताना स्तनपान करताना दिसल्या.

वॉटर्स यांनी ट्विट करत याबाबतची माहिती आणि फोटो प्रसिद्ध केला आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे, की माझी मुलगी आलिया हिचा मला खूप गर्व आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत स्तनपान करणारी ती पहिली लहान मुलगी ठरली आहे. आणखी महिला व दाम्पत्यांनी संसदेत असे केले पाहिजे. 

ऑस्ट्रेलियातील ग्रीन पार्टीच्या त्या उपनेत्या आहेत. मंगळवारी मातृत्व रजेहून परत संसदेत आल्यानंतर त्या आपल्या दोन महिन्यांच्या मुलीसह आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मुलीला संसदेत स्तनपान करत इतिहास घडविला. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन संसदेच्या कायद्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. महिला सिनेटरांना लहान मुलांना संसदेत आणण्याची परवानगी देण्यात आली होती. यापूर्वी सिनेटरांना लहान मुलांना संसदेत आणण्यास बंदी होती. 

Web Title: Australian senator scripts history by breastfeeding her baby in Parliament