न्यूझिलंडमधील सर्वात मोठ्या मीडिया संस्थेची केवळ 1 डॉलरमध्ये विक्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 मे 2020

कोरोना महामारीचा वाईट प्रभाव जगावर पडू लागल्याचं दिसत आहे. कारण न्यूझिलंडमधील एक मोठी माध्यम संस्था केवळ 1 डॉलरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला विकण्यात आली आहे. कंपनीच्या मालकाने याबाबतची घोषणा केली आहे. 

वेलिंग्टन- कोरोना महामारीचा वाईट प्रभाव जगावर पडू लागल्याचं दिसत आहे. कारण न्यूझिलंडमधील एक मोठी माध्यम संस्था केवळ 1 डॉलरमध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला विकण्यात आली आहे. कंपनीच्या मालकाने याबाबतची घोषणा केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

स्टफ ही न्यूझिलंडमधील माध्यम संस्था ऑस्ट्रेलियातील नाईन एंटरटेंमेंट या कंपनीच्या मालकीची आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे स्टफ संस्था आर्थिक संकटातून जात होती. जाहीरातीतून मिळणारे उत्पन्नही कमालीचे घटले असल्याने नाईन कंपनीने  कार्यकारी अधिकारी सिनाड बाउचर यांना स्टफची मालकी केवळ एका डॉलरका दिली आहे.

स्टफ ही न्यूझीलंडमधील नावाजलेली माध्यम संस्था आहे. संस्थेतर्फे देशातील अनेक दैनिक वृत्तपत्रांच्या छपाईचे काम केले जाते. तसेच संस्थेतर्फे स्टफ नावाची न्यूज वेबसाईट चालवली जाते. संस्थेत एकूण 900 कर्मचारीवर्ग असून 400 पत्रकार वेबसाईटसाठी काम करतात. महिन्याच्या शेवटापर्यंत विक्रिची प्रकिया पूर्ण होईल असं नाईनकडून सांगण्यात आलं आहे. 
----------
भाजपमध्ये धूसफूस; मागील महिन्याच्या राजकारणाचा पहिला बळी
----------
अभिमानास्पद ! युएनचा मिलिट्री जेंडर अ‍ॅडव्होकेट पुरस्कार मेजर सुमन गावनी यांना जाहीर
----------
स्टफ संस्थेच्या सीईओ आणि आता मालक झालेल्या सिनाड बाउचर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीची मालकी मिळणे माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मालकी मिळाली म्हणून काहीतरी चमत्कार घडेल आणि संस्था पूर्वपदावर येईल असं मला वाटत नाही. त्यासाठी योजना बनवावी लागेल. सध्यातरी कामगार कपातीचा माझा कोणताही विचार नाही. मात्र, पगार कपात करावी लागेल. तसेच संस्थेचे शेअर कामगारवर्गाला देऊन त्यांना डायरेक्ट मालकी देण्याचा विचार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. नाईन कंपनीने मालकी विकली असली तरी काही प्रमाणात वेलिंग्टनमधील छापखाण्याची मालकी स्वत:कडे ठेवणार आहे. तसेच मागे झालेल्या काही नफ्यातील हिस्सा आपल्याकडे ठेवणार आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यूझिलंडमधील अनेक माध्यम संस्था आर्थिक अडचणीला सामोरे जात आहेत. अनेक संस्थाने कामगार कपातीचे पाऊल उचलेले आहेत, तर अनेकांनी पगार कपात केली आहे. गेल्या महिन्यात जर्मन कंपनी बाऊर मीडियाने न्यूझिलंडमधील आपले काम बंद केले असून प्रसिद्ध होणारे सर्व मॅगझिन बंद केले आहेत. त्यामुळे कोरोना देशावर कोणता प्रभाव टाकून जाईल याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australias Nine sells Stuff for NZ$1 to New Zealand media cos CEO