हिटलरच्या जन्मस्थळी होणार पोलिस ठाणे, तीन मजली इमारतीची पुनर्रचना 

hitler birthplace
hitler birthplace

व्हिएन्ना, ता. ३ (पीटीआय): जर्मनीचा हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलरचे जन्मठिकाण असलेल्या घराचे रुपांतर आता एका पोलिस ठाण्यात होणार आहे. ऑस्ट्रियाच्या गृहमंत्रालयाने १९७२ रोजी ही तीन मजली इमारत भाड्याने घेतली आहे. या इमारतीचा दुरपयोग होऊ नये, हा यामागचा उद्देश होता. त्यानंतर विविध धार्मिक संघटनांच्या कार्यक्रमांसाठी या इमारतीचा वापर केला जात होता. 
ऑस्ट्रियाच्या प्रशासनाने या इमारतीचे नुतनीकरण आणि पुर्नबांधणीचा प्रस्ताव तयार केला आहे. या इमारतीचे रुपांतर पोलिस ठाण्यात करण्याचा विचार आहे. १८८९ रोजी हिटलरचा जन्म याच ठिकाणी झाला होता. नाझी हुकुमशहाचा गौरव होणार नाही आणि ते श्रद्धास्थान होणार नाही यासाठी त्या इमारतीचे पोलिस ठाण्यात रुपांतर केले जात आहे.

ऑस्ट्रियाचे आर्किटेक्ट मार्टे यांच्या डिझाइनची निवड झाली आहे. सरकारने याबाबतचे प्रस्ताव मागितले होते आणि त्यात मार्टे यांच्या रचनेची निवड झाली. मार्टे यांच्यासह ११ जणांनी निविदा भरल्या होत्या. त्यांना मागे टाकून मार्टेंचे डिझाइन निवडले गेले. याबाबतची घोषणा काल करण्यात आली. या इमारतीचे नुतनीकरण २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या कामावर सुमारे ५० लाख युरो म्हणजेच ४२ कोटी रुपये खर्च होण्याची शक्यचा आहे.

इमारतीचे पोलिस ठाण्यात रुपांतर करण्याबाबतची नोव्हेंबरमध्ये घोषणा करण्यात आली होती. हे घर जर्मनीच्या सीमेलगत असलेल्या ब्राउनाउ एम येथे असून त्याच्या मालकीवरून आणि भवितव्यावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होते. हा वाद २०१७ रोजी संपुष्टात आला. ऑस्ट्रियाच्या सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे घर जप्त करण्याचा सरकारला अधिकार असल्याचा निकाल दिला होता. त्याचबरोबर हे घर पाडण्याचा देखील प्रस्ताव आला होता. 

या इमारतीची पुर्नरचना करणारा आर्किटेक्ट हा सरळ आणि आधुनिक दृष्टीकोन राखणारा आहे. मात्र तो मूळ इमारतीच्या रचेनला आणि वस्तूला धक्का लावणार नाही, असा विश्‍वास ऑस्ट्रिया सरकारला आहे. जर्मन सीमेलगत असलेल्या शहरातील ही इमारत १९७२ रोजी गृहमंत्रालयाने भाडेतत्त्वावर घेतली होती. त्यानंतर विविध धार्मिक संघटनांच्या कामासाठी त्याचा वापर केला जात होता. २०११ रोजी या इमारतीत दिव्यांगांसाठी केअर सेंटर सुरू केले. तेव्हापासून ही इमारत रिकामीच आहे. 

 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com