हाँगकाँग प्रकरणात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मांडली महत्वाची भूमिका

boris johnson
boris johnson

लंडन, ता. 03 : चीनने हॉंगकॉंग वर नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला तरी, ब्रिटन हॉंगकॉंगच्या लोकांपासून फारकत घेणार नसल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आज म्हटले आहे. मात्र चीनचे हे पाऊल १९८४ च्या कराराअंतर्गत संघर्ष निर्माण करणारे असल्याचे ते म्हणाले.

चीनने नुकतेच हॉंगकॉंगवर अधिक नियंत्रण मिळवण्याच्या हेतूने नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर केला असून, या कायद्यानुसार  मध्ये स्वायत्त राजकीय असणारे वातावरण संपुष्टात येणार आहे.

शिवाय देशद्रोह, अलगाववाद, दहशतवाद यावर कडक निर्बंध लादण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त हॉंगकॉंगमधील परकीय हस्तक्षेप रोखण्यासाठी हा कायदा तयार केला आहे.    

गेल्या कित्येक वर्षांपासून हॉंगकॉंगमध्ये चीनच्या विरोधात आंदोलने होत आहेत. आणि वेळोवेळी चीनने देखील मुस्कटदाबी करत ही आंदोलने चिरडली. मात्र यावेळी चीनने मोठीच खेळी केली असून हॉंगकॉंगचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा आणला आहे.

या प्रस्तावित कायद्याविरोधात अमेरिका, ऑस्ट्रेलियासह अन्य राष्ट्रांनी जाहीर निषेध नोंदवला आहे. ब्रिटनने देखील चीनच्या या कायद्यास संयुक्त राष्ट्रसंघात विरोध केला होता.

त्याचबरोबर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी वेळोवेळी चीनची ही कृती बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज पुन्हा बोरिस जॉनसन यांनी चीनवर टीका केली आहे.     

लोक स्वतंत्र्य असल्यामुळेच  हॉंगकॉंगचा विकास झाल्याचे बोरिस जॉनसन यांनी सांगून, चीनने हॉंगकॉंग विषयक आपले धोरण असेच दामटत राहिल्यास संयुक्त राष्ट्राच्या मंचावर चीन आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या कराराचे उल्लंघन असल्याचे बोरिस जॉनसन यांनी आज पुन्हा म्हटले आहे.

चीनच्या या निर्णयामुळे हॉंगकॉंग मधील बहुतांशी लोकांना आपली जीवशैली धोक्यात आल्याची भीती वाटत असल्याचे बोरिस जॉनसन यांनी नमूद केले आहे.

आणि तरीदेखील चीन आपल्या याच निर्णयावर अडून राहणार असेल तर, ब्रिटन विवेकबुद्धीने आपल्या जबाबदारीचे पालन करत या संघर्षावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोरिस जॉनसन यांनी अधोरेखित केले आहे.      

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी काल मंगळवारी हॉंगकॉंगच्या नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याला विरोध करत, चीनला हा निर्णय मागे घेण्याचा इशारा दिला होता.

यासंबंधात बोलताना चीनने जर हॉंगकॉंग वर नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला तर, संपूर्ण आशियाच्या अर्थव्यवस्थेतील एक दागिना नष्ट होण्याचा धोका असल्याचे म्हटले होते. तसेच चीनच्या कृतीमुळे जागतिक पातळीवर चीनची प्रतिष्ठा धुळीस मिळणार असल्याचे बोरिस जॉनसन यांनी सांगितले होते.  

दरम्यान, ब्रिटनने १९९७ मध्ये हाँगकाँगला स्वातंत्र्य देऊन चीनच्या हवाली करताना हाँगकाँगच्या स्वायत्ततेची हमी देण्याचा करार केला होता. त्यामुळे हाँगकाँगमधील राजकीय गोष्टीना महत्वाचे स्थान न मिळता जागतिक पातळीवरचे आर्थिक केंद्र असेच हाँगकाँगचे वैशिठ्य टिकून राहिले.

मात्र एकाच देशात दोन वेगळ्या व्यवस्था तयार झाल्या. आणि चीनला नेमके हेच खटकत असल्याने चीनने नेहमी हाँगकाँगवर अधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु ठेवला. हाँगकाँगला  संरक्षण आणि परराष्ट्र संबंध हे दोन मुद्दे सोडून सर्व बाबतीत स्वायत्तता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com