अमेरिकेत सरासरी दररोज सापडतात एवढे रुग्ण; तर एवढ्या रुग्णांचा होतोय मृत्यू

पीटीआय
Thursday, 27 August 2020

अमेरिकेत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून मास्क वापरण्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी या देशात अद्यापही दररोज सरासरी एक हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे.

न्यूयॉर्क - अमेरिकेत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून मास्क वापरण्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी या देशात अद्यापही दररोज सरासरी एक हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अमेरिकेत सध्या सरासरी दररोज ४३ हजार नवे रुग्ण आढळत आहेत. ऑगस्टच्या सुरुवातीला आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा हे प्रमाण २१ टक्क्यांनी कमी आहे, अशी माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे. जगात अद्यापही अमेरिका, भारत आणि ब्राझील हे देश कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आघाडीवर असले तरी रुग्णवाढीचा आलेख खाली येत असल्याचेही दिसत आहे.

विमानांच्या घुसखोरीवरून  तणाव; युद्धसराव टिपल्याचा चीनचा आरोप

अमेरिकी नागरिकांमध्ये निर्माण झालेले गांभीर्य, त्यामुळे मास्क वापरण्याचे वाढलेले प्रमाण आणि जनतेची वाढलेली रोगप्रतिकारशक्ती यामुळे हा सकारात्मक बदल घडून येत असल्याचे कॅलिफोर्निया विद्यापीठातील संसर्ग रोग तज्ज्ञ डॉ. मोनिका गांधी यांनी सांगितले. गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना चाचणीतून रुग्ण सापडणाऱ्यांचे प्रमाणही ७.३ टक्क्यांवरून ६.१ टक्क्यांवर आले आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत एक लाख ७८ हजार जणांचा मृत्यू झाला असून कोरोनाबाधितांची संख्या ५७ लाखांहून अधिक झाली आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: average number of patients found daily in the America So many patients are dying