धक्कादायक! पितरांच्या शांतीसाठी 'या' समाजात महिलांची कापतात बोटे |Viral News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indonesia

धक्कादायक! पितरांच्या शांतीसाठी 'या' समाजात महिलांची कापतात बोटे

प्रत्येक ठिकाणी वेगवगेळ्या प्रथा अन् कु-प्रथा प्रचलित आहे. काही स्वीकारणाऱ्या प्रथा असतात पण काही प्रथा या कु-प्रथा असतात या कु-प्रथा ऐकूनच मन सुन्न होतं. सध्या अशीच एक कुप्रथा चर्चेचा विषय ठरली. एका समाजातील कु-प्रथेनुसार पितरांच्या शांतीसाठी महिलांची बोटे कापली जातात. हो, हे खरंय पण हे तितकंच धक्कादायक आहे.

हेही वाचा: Bachhu kadu viral video: बच्चू कडूंनी कार्यकर्त्यांच्या कानाखाली मारली'

प्रत्येक जमातीची एक वेगळी भाषा, राहणीमान आणि त्यांच्या प्रथा असतात. अशीच ही एक प्रथा वाचून तुम्हालाही धक्का बसेल. इंडोनेशियातील ‘दानी’ या जमातीमध्ये कुटुंबातील एखादा सदस्य मृत्यू पावला तर त्या कुंटूबातील महिलेला तिची बोटे कापावी लागतात. या प्रथेला आपण कु-प्रथा संबोधणार कारण अशा चुकीच्या कु-प्रथेमुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

हेही वाचा: Viral Video: तर कंडोम ही मोफत द्यावे लागतील; महिला IAS अधिकाऱ्याचे वादग्रस्त विधान

इंडोनेशियात या प्रथेला इकिपलिन म्हणतात. तेथील सरकारने या प्रथेवर बंदी घातली होती तरीसुद्धा तेथील लोक ही प्रथा पाळतात. विशेषत: तेथील दानी समाजातील महिला या कु-प्रथेचा शिकार होतात. पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी ही क्रुर प्रथा पाळली जाते.

महिलेचे बोट हे कुऱ्हाडीने कापले जाते. प्रथम हे बोट दोरीने बांधले जाते त्यानंतर त्यावर कुऱ्हाडीने वार केला जातो. मग ते बोट जाळले जाते. ही भयावह कुप्रथा विकृत स्वभावाची आहे. इंडोनिशिया सरकारने यावर बंदी घालून सुद्धा दुर्दैवाने ही प्रथा अजूनही पाळली जाते.

टॅग्स :Indonesiawomen