Bangladesh Blackout: पावर ग्रिड फेल झाल्याने बांग्लादेशाची 'बत्ती गुल!' संपूर्ण देश अंधारात

bangladesh blackout due to national power grid failure no power supply say govt
bangladesh blackout due to national power grid failure no power supply say govt sakal media

ढाका : बांगलादेशातील नॅशनल पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्यामुळे मंगळवारी (4 ऑक्टोबर) संपूर्ण देशात ब्लॅकआउट झाला. सरकारच्या पॉवर युटिलिटी कंपनीने सांगितले की नॅशनल पावर ग्रिड निकामी झाल्यामुळे बांगलादेशातील सुमारे 140 दशलक्ष नागरिकांना वीजेशिवाय राहावे लागले. बांगलादेशातील नॅशनल पॉवर ग्रीडमध्ये मंगळवारी दुपारी सुमारे 2:05 वाजता बिघाड झाला. यामुळे बांगलादेशच्या उत्तरेकडील काही भाग वगळता देशभरात वीजपुरवठा खंडित झाला आहे.

विद्युत विभागाचे प्रवक्ते शमीम हसन यांनी सांगितले की राजधानी ढाका आणि इतर प्रमुख शहरांमधील सर्व वीज प्रकल्प बंद करण्यात आले आणि वीज खंडित करण्यात आली. बिघाड कुठे आणि का झाला हे शोधण्याचा अभियंते प्रयत्न करत असून यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी काही तास लागू शकतात, असे ते म्हणाले.

डिझेलवर चालणारे प्लांट बंद

आयातीसाठी लागणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारने सर्व डिझेलवर चालणाऱ्या वीज प्रकल्पांचे कामकाज स्थगित केल्यामुळे किमती वाढल्या आहेत. डिझेलवर चालणारे पॉवर प्लांट बांगलादेशातील सुमारे 6% वीज निर्मिती करतात, त्यामुळे त्यांच्या बंदमुळे उत्पादन 1500 मेगावॅटपर्यंत कमी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com