Bangladesh Election 2024
Bangladesh Election 2024Esakal

Bangladesh Election 2024: बांगलादेशमध्ये निवडणुकांना हिंसक वळण! दोन जण ठार, अनेक भागात मतदान थांबवलं

Bangladesh Election 2024: बांगलादेशातील बीएनपी पक्षासह अनेक विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मतदानाच्या दिवशी हिंसाचाराच्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती, ती खरी ठरली आहे. बांगलादेश निवडणुकांना हिंसक वळण लागलं आहे.

बांगलादेशमध्ये मतदानाच्या दरम्यान, चटगांवच्या पहारी कॉलेजमध्ये दोन पक्षांमध्ये झालेल्या हाणामारीत दोन जणांचा गोळ्या झाडून मृत्यू झाल्याची बातमी आहे. हे चटगांव-10 मतदारसंघाचे क्षेत्र आहे. हलिसहर-पहारतली-खुळशी भागातील या मतदारसंघात नाओचे उमेदवार मोहम्मद मोहिउद्दीन असून चटगांव महापालिकेचे माजी महापौर मोहम्मद मंजूर आलम हे अपक्ष उमेदवार झाले आहेत.

चटगांव मेट्रोपॉलिटन पोलिस डीसी नॉर्थ यांनी गोळीबाराच्या या घटनेला दुजोरा दिला आहे. याशिवाय चटगांवच्या एका महिला अध्यक्षाला अनियमिततेच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Bangladesh Election 2024
Bangadesh Election : हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात आज मतदान! २७ पक्षांचे सुमारे १५०० उमेदवार रिंगणात

बांगलादेशमध्ये मतदानादरम्यान हिंसक संघर्ष होण्याची भीती आधीच व्यक्त केली जात होती, कारण विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. शेख हसीना पंतप्रधान असताना ते कधीही निवडणूक जिंकू शकत नाहीत, असा त्यांचा विश्वास आहे.

देशभरात 37 ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे वृत्त आहे. निवडणूक आयोगाच्या नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील 37 मतदान केंद्रांवर गैरप्रकार आणि अनियमिततेच्या घटना आढळून आल्या आहेत. बनावट मतदानाच्या आरोपाखाली सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Bangladesh Election 2024
Israel-Hamas War : हमासच्या नेत्याच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाहचा इस्राइलवर मोठा हल्ला! डागली 62 क्षेपणास्त्रे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com