

esakal
Hindu businessman was brutally killed in Bangladesh : बांगलादेशमधील संसदीय निवडणुकीच्या दोन दिवस आधी, आणखी एका हिंदू व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. बांगलादेशातील मैमनसिंग येथील त्रिशाल येथे अज्ञात हल्लेखोरांनी ६२ वर्षीय हिंदू व्यावसायिक सुसेन चंद्रसरकार यांची त्यांच्या दुकानात हत्या केली.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर गुरुवारी बांगलादेशमध्ये पहिल्यांदाच संसदीय निवडणुका होत आहेत. तर निवडणुकीपूर्वी अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. आता, निवडणुकीच्या दोन दिवस आधी, आणखी एका हिंदूची हत्या करण्यात आली आहे, ज्यामुळे अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले आणि सुसेन चंद्रसरकार यांना दुकानातच सोडले आणि शटर बंद केले. यानंतर चंद्रसरकार यांचे कुटुंब त्यांचा शोध घेत होते आणि जेव्हा त्यांनी दुकान उघडले तेव्हा त्यांना ते रक्ताने माखलेला अवस्थेत आढळले. यानंतर तातडीने चंद्रसरकार यांना मैमनसिंग मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
१ डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान किमान १५ हिंदूंची हत्या झाली. युनूस सरकारने त्यांच्या अहवालात मान्य केले की अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचार वाढला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.