Hindu Homes Set on Fire in Bangladesh: बांगलादेशात हिंदू नागरिकांना कोंडून बाहेरून घरांना लावली आग; भयानक घटनेचा व्हिडिओ आला समोर

Attack on Hindu families in Bangladesh : एवढंच नाहीतर घरातील लोकांना बाहेर पडता येऊ नये म्हणून बाहेरून कुलूपंही लावली गेली.
Burnt houses belonging to Hindu families in Bangladesh after an alleged attack, raising serious concerns about religious violence and minority protection.

Burnt houses belonging to Hindu families in Bangladesh after an alleged attack, raising serious concerns about religious violence and minority protection.

esakal

Updated on

Hindu houses burned in Bangladesh : बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना निवडक लक्ष्य करण्याचे प्रकार सुरूच आहेत. नुकतीच पिरोजपूर जिल्ह्यात एक अतिशय भयानक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या ठिकाणी जळपास पाच ते सहा हिंदू कुटुंबांची घरे पेटवून देण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे ही घरं पेटवली तेव्हा सर्व हिंदू कुटुंबे ही घरातच झोपलेली होती.

तर आणखी संतापजनक बाब म्हणजे आग लागल्यानंतर घरात झोपलेल्या हिंदू कुटुंबांना बाहेर येता येऊ नये, म्हणून कट्टरपंथीयांनी आणि उपद्रवींना त्या हिंदू कुटुबांची घरे बाहेर बंद केली आणि जाळली. या भयानक घटनेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबद्दल पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बांगलादेशात हिंदू तरुण दीपू चंद्र दास यास बेदम मारहाण करून जाळण्यात आल्याच्या भयानक घटनेनंतर ही घटना घडली आहे. ही घटना २७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर पिरोजपूर जिल्ह्यातील डुमरीतला गावात घडली आहे.  यामुळे बांगलादेशातील सहा कुटुंबासाठी २७ डिसेंबरची रात्र ही एक अतिशय भयानक रात्र होती.

Burnt houses belonging to Hindu families in Bangladesh after an alleged attack, raising serious concerns about religious violence and minority protection.
Abu Azmi on Bangladesh Mob Lynching : बांगलादेशात जमावाने हिंदू तरूणास बेदम मारून जाळलं ; संतापजनक घटनेवर अबू आझमींची प्रतिक्रिया, म्हणाले...

रिपोर्टनुसार असे दिसते की, हल्लेखोरांनी पद्धतशीरपणे हिंदू घरांना वेढा घातला. त्यांनी केवळ बाहेरून आग लावली नाही तर पळून जाण्यापासून रोखण्यासाठी बाहेरून दरवाजे देखील बंद केले. जेव्हा कुटुंबातील सदस्य जागे झाले तेव्हा त्यांना संपूर्ण घर आगीत वेढलेले आढळले आणि एकच आरडाओरड सुरू झाली. मृत्यूला तोंड देत  कुटुंबातील सदस्यांनी धाडस केले आणि कसाबसा आपला जीव वाचवण्यात त्यांना यश मिळवले.  परंतु त्यांचे संपूर्ण घर आणि त्यातील सामान राखेत जळून खाक झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com