

A symbolic image representing violence against Hindu minorities in Bangladesh, highlighting growing concerns over mob attacks and human rights violations.
esakal
Bangladesh mob lynching News : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच दीपू चंद्र दास या तरूणाला जमावाने आधी बेदम मारहाण करून ठार मारेल आणि नंतर त्याला झाडावर लटकवून जाळल्याची संतापजनक घटना घडली होती. त्यानंतर आता बांगलादेशाती जमावाने आणखी एका हिंदू तरूणाला बेदम मारहण करून त्याचा जीव घेतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बांगलदेशी जमावाने अमृत मंडल उर्फ सम्राट या २८ वर्षीय तरूणाची हत्या केली आहे. ही घटना राजबारी जिल्ह्यात घडली. पांगशा मॉडेल पोलिस स्टेशनने या घटनेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी म्हणणे आहे, की स्थानिक रहिवाशांनी अमृत मंडलवर खंडणीचा आरोप केला होता, ज्यामुळे तो जमावाच्या हिंसाचाराचा बळी ठरला.
पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये अमृत मंडलचे नावा स्थानिक टोळीचा प्रमुख असे नोंदवले गेले आहे. याशिवाय, मंगळवारी, चितगावजवळील रौजन परिसरात एका हिंदू कुटुंबाचे घर जाळण्यात आले. रौजन परिसरात पाच दिवसांत सात हिंदू कुटुंबांची घरे जाळण्यात आली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे.
खरंतर गेल्या आठवड्यातच मैमनसिंग शहरातील जमावाने २८ वर्षीय हिंदू कारखान्यातील कामगार दीपू चंद्र दास याचा बेदम मारहाण करून जीव घेतला होता. त्याच्यावर ईशनिंदा केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र पोलिस तपासाअंती हा आरोप खोटा ठरला होता.
या घटनेने देशभरात निदर्शने सुरू झाली आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही बांगलादेश सरकारला सुनावले गेले आहे. तरीही पुन्हा एका हिंदू तरूणाचा जमावाने जीव घेतला आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मानवाधिकार संघटना ऐन ओ सालिश केंद्राने २०२५ मध्ये बांगलादेशात आतापर्यंत हिंसाचारात १८४ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.