Hindu Youth Brutally Killed in Bangladesh
esakal
विरोधी नेते शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेशमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि आंदोलनं सुरू आहेत. यादरम्यान जमावाकडून एका हिंदू तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. इतकच नाही, तर मृत्यूनंतर त्याचा मृतदेह झाडाला बांधून पेटवण्यात आला आहे. या घटनेनं सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे.