

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू समूदायावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी दुर्गा पुजा मंडवार झालेल्या हल्ल्यानंतर आता पुन्हा एकदा हिंदू मंदीरात तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर आता बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिदू सामूदायाच्या वतीन देशव्यापी अमरण उपोषण करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
बांगलादेशची राजधानी ढाकापासून १५७ किमी अंतरावर असलेल्या फेनीमध्ये हिंदू मंदीर आणि परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. जमावाने मंदिरे आणि दुकानांची तोडफोड करत लुटालूट केली. दुर्गापूजेवेळी झालेल्या हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी येथे हिंदू नागरिकांनी मोर्चा काढला असताना या मोर्चावर काही जणांनी हल्ला केला. या हल्ल्यावेळी संघर्ष निर्माण झाल्यानंतर काही समाजकंटकांनी मंदिरे आणि दुकानांना लक्ष्य केले. या संघर्षामध्ये किमान चाळीस जण जखमी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी मुंशिगंज भागातील काली मंदिरातील सहा मूर्त्यांची विटंबना केली.
दुर्गापूजेच्या काळात हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बांगलादेशात अनेक ठिकाणी निषेध मोर्चे निघाले. सामान्य जनतेनेही या हल्ल्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. हल्ल्यांचा निषेध आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी बांगलादेश हिंदू बुद्धीस्ट ख्रिस्ती युनिटी कौन्सिलने २३ ऑक्टोबरला देशव्यापी धरणे आंदोलन आणि उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशमधील पूजा उद्यापन परिषदेनेही दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषींवर सरकारने कारवाई न केल्यास आणि आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.