

Dhaka: पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचीच भाषा आता बांगलादेशातले लोक बोलू लागले आहेत. देशाचे निवृत्त ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहिल अमान आझमी यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे. जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत बांगलादेशात शांतता निर्माण होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. आझमी यांचा भारताविरोधाचा रोष तसा जुनाच आहे.