esakal | राहुल गांधींमध्ये कमी योग्यता, बराक ओबामांनी पुस्तकात केला उल्लेख
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी राहूल गांधी यांचा उल्लेख त्यांच्या 'अ प्रॉमिस्ड लँड' या पुस्तकात केला आहे

राहुल गांधींमध्ये कमी योग्यता, बराक ओबामांनी पुस्तकात केला उल्लेख

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

वॉशिंग्टन: 2014 च्या लोकसभा काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसची मुख्य धूरा राहूल गांधींच्या खांद्यावर होती. पण भाजपाने राज्यातील पक्षांची चांगली मोट बांधून आणि नरेंद्र मोदी यांच्या प्रसिध्दीचा वापर करून केंद्रात सत्ता आणली होती. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 50 पेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे राहूल गांधी यांच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

आता अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी राहूल गांधी यांचा उल्लेख त्यांच्या 'अ प्रॉमिस्ड लँड' या पुस्तकात केला आहे. या पुस्तकात त्यांच्यावर टीका केली आहे. या पुस्तकात जगभरातील विविध नेत्यांचा उल्लेख आहे.

'राहूल गांधी हे नर्वस आणि अपरिपक्व व्यक्ति आहेत. ते एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे आहेत, जे आपल्या शिक्षकाला इंप्रेस करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना त्यात वारंवार अपयश येत असते.' अशी वर्णन बराक ओबाम यांनी राहूल गांधी यांचं केलं आहे.

अभिमानास्पद! बायडेन यांच्या टीममध्ये 20 पेक्षा अधिक भारतीय वंशाचे व्यक्ती

ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात भारताचे माजी राष्ट्रपती मनमोहन सिंग यांच्याबद्दलही लिहलं आहे. 'प्रचंड निष्ठा ठेवणारा व्यक्ती' असा उल्लेख मनमोहन सिंग यांचा आहे. तसेच बराक ओबामा यांच्या पुस्तकात अमेरिकेचे नवीन राष्ट्रध्यक्ष ज्यो बायडन यांचाही उल्लेख आहे.

भारताच्या दबावासमोर पाकिस्तान झुकला; मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई

बराक ओबामा यांचे 'अ प्रॉमिस्ड लँड' हे नवे पुस्तक सध्या खूप चर्चेत आहे. ओबामा यांनी यापूर्वी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात ड्रीम्स फ्रॉम माई फादर, आणि 'चेंज वी कैन बिलीव इन' यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ओबामांच्या नव्या पुस्तकात माजी काँग्रेस अध्यक्ष आणि लोकसभेचे खासदार राहुल गांधी यांचा उल्लेख आहे.

(edited by- pramod sarawale)