esakal | अभिमानास्पद! बायडेन यांच्या टीममध्ये 20 पेक्षा अधिक भारतीय वंशाचे व्यक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

biden1

राष्ट्रपती हस्तांतरण टीम इतिहासातील सर्वात विविधता असलेली टीम असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिमानास्पद! बायडेन यांच्या टीममध्ये 20 पेक्षा अधिक भारतीय वंशाचे व्यक्ती

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे विजेता ज्यो बायडेन यांनी 20 पेक्षा अधिक भारतीयांचा आपल्या एजेंसी रिव्हूव टीममध्ये (ART) समावेश करुन घेतला आहे. यातील तीन भारतीय वशांचे व्यक्ती टीमचे नेतृत्व करतील. ही टीम फेडरल एजेंसिच्या प्रशासन कार्यप्रणालीची समीक्षा करेल. जेणेकरुन सत्तेचे हस्तांतरण सहजपणे होईल.

विविधता असलेली बायडेन यांची टीम 

राष्ट्रपती हस्तांतरण टीम इतिहासातील सर्वात विविधता असलेली टीम असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या सत्ता हस्तांतरणासाठी बनवण्यात आलेल्या टीममध्ये 100 पेक्षा अधिक सदस्य आहेत. ज्यात अर्ध्यापेक्षा अधिक महिला आहेत. यात कृष्णवर्णीय, एलजीबीटी आणि विकलांग यांचाही समावेश आहे. 

"भाजपने रामविलास पासवानांचा राजकीय वारसा संपवला"

कोणत्या भारतीयांचा समावेश असेल

माहितीनुसार स्टॅनफोर्ट विश्वविद्यालयाचे अरुण मजूमदार उर्जा विभागाच्या सत्ता हस्तांतरणाच्या टीमचे नेतृत्व करतील. राहुल गुप्ता राष्ट्रीय औषधी नियंत्रण नीती प्रकरणाचे नेतृत्व करतील, तर किरण आहुजा कर्मचारी व्यवस्थापनसंबंधी बनलेल्या टीमचे नेतृत्व करतील. पुनीत तलवार यांचा विदेश विभागसंबंधी टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. पाव सिंह यांना राष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि विज्ञान औद्योगिक टीममध्ये स्थान मिळालेय. अरुण वेंकटरमण यांचा वाणिज्य आणि यूएसटीआर प्रकरणातील दोन टीममध्ये घेण्यात आले आहे. 

प्रवीण राघवन आणि आत्मन त्रिवेदी यांचा वाणिज्य विभागाच्या टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. शिक्षण विभागात शीतल शाह, उर्जा विभागात आर रमेश आणि रामा जाकिर, अंतर्गत सुरक्षा विभागासंबंधी टीमध्ये शुभश्री रामनाथन, न्याय विभागात राज डे, श्रम विभागात सीमा नंदा आणि राजनायक यांचा समावेश आहे.

फेडरल रिझर्व्ह आणि नासाच्या टीममध्येही भारतीय

याशिवाय फेडरल रिझर्व्ह आणि बँकिग प्रकरणांसाठी रीमा अग्रवाल आणि सत्याम खन्ना, नासासाठी भव्या लाल, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसाठी दिलप्रित सिद्धू, नियोजन आणि बजेट कार्यालयासाठी दिव्य कुमारियाह, कृषी विभागासाठी कुमार चंद्रण आणि पोस्टल सेवासाठी अनीषा चोपडा. सर्व सदस्यांना स्वयंसेवी पद्धतीने सामील करुन घेण्यात आले आहे.

loading image
go to top