Barack Obama: माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी जिंकला 'एमी पुरस्कार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

barack-obama

Barack Obama: माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी जिंकला 'एमी पुरस्कार'

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना यंदाच्या टीव्ही पुरस्कारातील मानाचा मानला जाणारा एमी पुरस्कार मिळाला आहे. 'अवर ग्रेट नॅशनल पार्क्स' या डॉक्युमेंटरी मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट कथाकार म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला असून जगभरातील राष्ट्रीय पार्क संदर्भात नेटफ्लिक्सवर माहितीपटाची पाच भागात सिरीज त्यांनी बनवली आहे.

(Barack Obama Win Emmy Award)

दरम्यान, ओबामा हे एमी पुरस्कार जिंकणारे दुसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांनी डेव्हिड अ‍ॅटनबरो, लुपिता न्योंग'ओ आणि करीम अब्दुल-जब्बार यांना मागे टाकत हा पुरस्कार जिंकला आहे. त्याचबरोबर याअगोदर त्यांनी ग्रॅमी, ऑस्कर आणि टोनी हे पुरस्कार जिंकले आहेत. दरम्यान, त्यांनी २०१७ मध्ये पद सोडल्यानंतर त्यांनी नेटफ्लिक्सशी करार केला होता. त्यानंतर त्यांनी या कामाला सुरूवात केली होती.

बराक ओबामा यांनी याआधी "द ऑडेसिटी ऑफ होप" आणि "ड्रीम्स फ्रॉम माय फादर" च्या ऑडिओसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकले होते. त्यानंतर आता एमी पुरस्कारावर त्यांनी मोहोर उमटवली आहे. तर एमी पुरस्कार जिंकणारे ड्वाइट आयझेनहॉवर हे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्स आयोजित करणारे पहिले अध्यक्ष बनल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला होती.

टॅग्स :global newsBarack Obama