Batla House Encounter: दहशतवादी अरिज खानला फाशी नाही तर... न्यायालयाने निर्णय कायम ठेवत शिक्षेत केला बदल

Batla House Encounter
Batla House Encounter

Batla House Encounter: बाटला हाऊस चकमक प्रकरणातील दोषी दहशतवादी अरिज खानला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने अरिज खानला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. दिल्लीचे पोलीस निरीक्षक मोहनचंद शर्मा यांच्या हत्येप्रकरणी खान यांना ट्रायल कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.

ट्रायल कोर्टाने 8 मार्च 2021 रोजी अरिज खान याला दोषी ठरवले होते आणि 15 मार्च 2021 रोजी त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.

2008 मध्ये दिल्लीत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर काही दिवसांनी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची बाटला हाऊसमध्ये दहशतवाद्यांशी चकमक झाली आणि त्यात 19 सप्टेंबर 2008 रोजी इन्स्पेक्टर शर्मा शहीद झाले.

या साखळी बॉम्बस्फोटात दिल्लीतील 39 जणांचा मृत्यू झाला होता, तर 159 जण जखमी झाले होते. शर्मा यांनी या बॉम्बस्फोटांना जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांच्या शोधात छापा टाकला होता.

Batla House Encounter
BSNL Tower : सीमेवर तैनात सैनिकांना मिळणार फुल नेटवर्क, BSNL आणि भारतीय सैन्याने 15,000 फूट उंचीवर उभारला BTS टॉवर

यावेळी दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणात इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा यांना जीव गमवावा लागला, तर बलवंत सिंग-राजवीर यांना मारण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल आतिफ अमीन आणि मोहम्मद साजिद ठार झाले. (Latest Marathi News)

तर आरोपी शहजाद अहमद याला अटक करण्यात आली. आरोपी शहजाद अहमदला 2013 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. चकमकीदरम्यान अरिज पळून गेला होता, तर त्याला 2018 साली नेपाळमधून अटक करण्यात आली होती.

Batla House Encounter
India vs Pakistan World Cup : टीम इंडियाचा विजय अन् पाकिस्तानी फॅनने स्वतःवर झाडून घेतली गोळी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com