Beach And Sex : सेक्समुळे स्पेनचा सुंदर समुद्रकिनारा झाला उद्ध्वस्त; आढळले २९८ स्पॉट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beach

सेक्समुळे स्पेनचा समुद्रकिनारा झाला उद्ध्वस्त; आढळले २९८ स्पॉट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सुट्या लगल्या की लोक पर्यटनाचा बेत आखतात. घरी राहण्यापेक्षा बाहेर फिरून ताजे होण्याकडे त्यांचा कल असतो. यासाठी निम्यापेक्षा जास्त लोक विदेशवारीची पर्यटनासाठी निवड करतात. यातही युरोपला अधिक प्राधान्य दिले जाते. यामुळे युरोपात पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. यामुळे युरोप सरकारला मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. मात्र, याच पर्यटकांमुळे त्यांना नुकसानही सोसावे लागले आहे.

परदेशात प्रवास करणारे बहुतेक लोक सुट्टी युरोपमध्ये साजरी करतात. मात्र, अतिपर्यटनामुळे येथील सभ्यता, संस्कृती, स्थानिक जीवन आणि ऐतिहासिक स्थळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अहवालानुसार, ऐतिहासिक ठिकाणी बाहेरून येणारे पर्यटक खूप असतात. ते घाण पसरवत आहे. एवढेच नाही तर सुंदर समुद्रकिनारा आणि नैसर्गिक देखावांमध्ये सेक्स करून याचा प्रसार व प्रचार करीत आहे.

हेही वाचा: दारूसोबत चकणा म्हणून या पदार्थांचे तर सेवन करत नाही ना?

पर्यटकांसाठी युरोप नेहमीच आकर्षणाचा केंद्र राहिला आहे. विदेशी पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात भेटी देतात. जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंटमधील अभ्यासानुसार, वाळू, सूर्य, समुद्र आणि अनोळखी व्यक्तींसोबत सेक्स या फाइव्ह ‘एस’मुळे स्पेनच्या प्रसिद्ध ग्रॅन कॅनरिया बेटाच्या पर्यावरणाला हानी पोहोचत आहे.

ग्रेन कॅनरिया बेट पर्यटकांच्या कृत्यांमुळे खराब होत आहे. हे बेट त्याचे खास निसर्ग आणि जंगली वाळूच्या ढिगाऱ्यांसाठी ओळखले जाते. येथे भेट देण्यासाठी पर्यटक दूर-दुरून येतात. येथील वाळूचे ढिगारे १९८२ मध्ये सापडले होते. तेव्हापासून कायदेशीररीत्या संरक्षित आहे. हे ढिगार आफ्रिका आणि युरोपमधील स्थलांतरित पक्ष्यांसाठी विश्रामगृह आहे. मात्र पर्यटक ते खराब करीत आहे.

हेही वाचा: सासू, सासरे व पत्नीचा त्रास अन् युवकाने उचलले टोकाचे पाऊल

ग्रेन कॅनरियाचा महाकाय सरडा पाहण्यासाठी लोक लांबून येत होते. मात्र, पर्यटकांनी सेक्स केल्यानंतर टाकलेले कंडोम खाऊन तिचा मृत्यू झाला. समलैंगिकांमध्येही हे स्थान अगदी लोकप्रिय आहे. विशेषत: अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीतील पर्यटक येथे येतात. सार्वजनिक लैंगिक संबंधामुळे मोठी हाणी होत आहे. पर्यटकांनी याचा विचार करायला हवा.

२९८ सेक्स स्पॉट

संशोधकांना समुद्रकिनाऱ्यावर २९८ सेक्स स्पॉट सापडले आहेत. झाडं आणि ढिगाऱ्यांमध्ये हे स्पॉट सापडले आहेत. या ढिगाऱ्यांचा वापर पर्यटक सेक्ससाठी करीत आहेत. पर्यटकांच्या या अश्लील कृत्यामुळे झाडांच्या आठ स्थानिक प्रजातींवर परिणाम होत आहे. पर्यटक सेक्स करण्यासाठी या वनस्पती तुडवतात, वनस्पती आणि वाळू काढून टाकतात आणि त्याला सेक्स स्पॉट बनवतात.

सेक्स स्पॉट जितका दूर तितका वापर

येथे येणारे पर्यटक सेक्स करण्यासाठी छोटे गड्डे तयार करतात. या गड्ड्यामध्ये सिगरेट, कंडोम, टॉयलेट पेपर, वाइप्स आणि कॅन यासारखा कचरा फेकतात. तसेच पर्यटक ढिगारांचा शौचालय म्हणून देखील वापर करतात. संशोधकांना असे आढळले की सेक्स स्पॉट जितके दूर असतात त्याचा तितकाच जास्त वापर होतो. तसेच जास्त कचरा टाकला जातो.

loading image
go to top