तंबाखूच्या जाहिरातीसाठी जगभरातील कंपन्या किती खर्च करतात?

पीटीआय
सोमवार, 1 जून 2020

युवकांना आवाहन
जनजागृती करताना अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रयत्न करत असून त्यासाठी टिकटॉकवर #TobaccoExposed या हॅशटॅगद्वारे युवकांना आवाहन करण्यात आले आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही जनजागृती केली जात आहे. तंबाखूचे विविध दुष्परिणाम मुलांच्या मनावर ठसविण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रमही संघटनेतर्फे राबविले जात आहेत.

न्यूयॉर्क - युवकांना लक्ष्य करत जगभरातील तंबाखू उद्योग दरवर्षी आपल्या उत्पादनांची जाहीरात करण्यासाठी ९ अब्ज डॉलरचा खर्च करतात. सध्या १३े १५ वयोगटातील जगातील चार कोटी मुले तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने आज ‘जागतिक तंबाखू दिना’निमित्त दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

युवकांमध्ये तंबाखूच्या दुष्पपरिणांबाबत जाणीव निर्माण व्हावी, यासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रयत्न करत आहे. ‘तंबाखूची उत्पादने विकणाऱ्या कंपन्या युवकांना लक्ष्य करत असून आपल्या मालाची जाहीरात करण्यासाठी ते दरवर्षी मोठा खर्च करतात. तंबाखूजन्य रोगांमुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याने त्यांच्या जागी नवे व्यसनी तयार व्हावेत, असा या उद्योगाचा प्रयत्न असतो. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळातही तंबाखूजन्य उत्पादनांची जाहीरात केली जात आहे,’ असा इशारा आरोग्य संघटनेने दिला आहे. जगातील धुम्रपान करणाऱ्यांपैकी ९० टक्के जणांना ही सवय त्यांच्या १८ व्या वर्षाआधीच लागलेली असते, असे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे.

चीनच्या कुरापतीदरम्यान 'बलशाही भारत'चे दर्शन!, ही आहे भारताची ताकद

व्यसनाचा विळखा
९ अब्ज डॉलर - तंबाखू उद्योगांचा जाहीरातीवरील खर्च
४ कोटी - तंबाखूसेवन करत असलेली किशोरवयीन मुले
८ कोटी - तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी होणारे मृत्यू

आरोग्य संघटनेचा इशारा

  • ई स्मोकींग आणि हुक्का सुरक्षित नाही
  • ई स्मोकींगमुळे फुफ्फुस आणि ह्रदयाचे विकार शक्य
  • बबलगम आणि कँडीच्या स्वरुपातही तंबाखूजन्य वस्तूंची विक्री
  • तंबाखू उत्पादनांना ‘जीवनावश्‍यक’ करण्याचा काहींचा प्रयत्न

युवकांना आवाहन
जनजागृती करताना अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना प्रयत्न करत असून त्यासाठी टिकटॉकवर #TobaccoExposed या हॅशटॅगद्वारे युवकांना आवाहन करण्यात आले आहे. इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही जनजागृती केली जात आहे. तंबाखूचे विविध दुष्परिणाम मुलांच्या मनावर ठसविण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रमही संघटनेतर्फे राबविले जात आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beware of tobacco advertisements