चीनच्या कुरापतीदरम्यान 'बलशाही भारत'चे दर्शन!, ही आहे भारताची ताकद

टीम ई-सकाळ
सोमवार, 1 जून 2020

चीनने आपल्या अर्थसकल्पात संरक्षण क्षेत्रात भारताच्या तिप्पट खर्च करण्याचे निश्चित केले असले तरी जगभरातील देशात भारताचे वर्चस्वही वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनाजन्य परिस्थितीत लडाखच्या सीमारेषेवरील लष्करी जवानांच्या हालचालींमुळे भारत-चीन यांच्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. चीनने आपल्या अर्थसकल्पात संरक्षण क्षेत्रात भारताच्या तिप्पट खर्च करण्याचे निश्चित केले असले तरी जगभरातील देशात भारताचे वर्चस्वही वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. G7 या जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात आघाडीवर असलेल्या अर्थव्यवस्थांच्या देशांच्या संघटनेच्या शिखर परिषदेसाठी भारताला निमंत्रित करणार असल्याचे म्हटले आहे. G7 या समुहात सध्याच्या घडीला फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका, युके आणि कॅनडासहित सात राष्ट्रांचा समावेश आहे. या गटात स्थान मिळाल्यानंतर भारताची ताकद निश्चितच वाढेल.   

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मोदी म्हणाले, सोबत बसून समोसा खाऊ!

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या वेगाने होणाऱ्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 46 व्या G7 शिखर संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.  शिखर परिषद सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलत असल्याची घोषणा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. यावेळी त्यांनी आगामी शिखर संमेलनात भारतासह ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण कोरियाला आमंत्रित करणार असल्याचे सांगितले होते. G7 शिखर संमेलन 10 जून ते 12 जून दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार होते. पण तूर्तास या संमेलन स्थगित करण्यात आले आहे. ज्या  G7 शिखर संमेलनात चीनचा समावेश नाही त्यात भारताचा समावेश झाल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ताकद वाढेल. 

'ट्विटर'ने बजावली ट्रम्प यांना नोटीस

अमेरिकेसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे यापूर्वी देखील भारताला महत्त्वपूर्ण समुहात स्थान मिळाले आहे. अमेरिकेच्या भूमिकेनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसनने समोसा डिप्लोमेसीच्या माध्यमातून एक अनोखा संदेश दिल्याचे पाहायला मिळाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत समोसा फोटो शेअर करत आहे, अशा आशयाचे ट्विट करत ऑस्ट्रेलियाने भारताला आणखी बळ दिल्याचे चित्र दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ट्विटवर प्रतिक्रिया देखील दिली आहे. कोरोना विषाणू विरोधातील लढा जिंकल्यानंतर तुमच्यासोबत समोसा खाण्याचा आनंद नक्की घेईन, या आशयाचे ट्विट करत मोदींनी अप्रत्यक्षरित्या चीनला चिमटा काढला आहे. 

क्वाड सदस्य राष्ट्रांच्यातील कमालीचा ताळमेळ 

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया चार देशांता क्वाड समूहात समावेश आहे. अमेरिका या गटाला अधिक ताकत मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे चीनने नेहमीच या गटाच्या विरोधात मोर्चेबांधणी केल्याचे पाहायला मिळाले आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india diplomatic power target china