पंतप्रधानपद सांभाळून 'ते' करताहेत शस्त्रक्रिया

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मे 2019

भूतानच्या पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या डॉ. लोटे शेरिंग यांनी शनिवारी (ता. 11) तेथील रूग्णालयात एका रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या शेरिंग हे भूतानचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

थिंफू : भूतानच्या पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या डॉ. लोटे शेरिंग यांनी शनिवारी (ता. 11) तेथील रूग्णालयात एका रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. पेशाने डॉक्टर असलेले शेरिंग हे भूतानचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पंतप्रधान डॉ. शेरिंग हे आठवड्यातील पाच दिवस पंतप्रधान म्हणून काम करतात, इतर दोन दिवस ते आपले वेळ रूग्णांची सेवा करण्यात घालवतात. शनिवारी त्यांनी भूतानमधील जिग्मे दोरजी वांगचुक नॅशनल रेफरल रुग्णालयात एका रूग्णावर मूत्रपिंडाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. 'रूग्णांची सेवा करणे हा माझ्यासाठी तणावमुक्तीचा मार्ग आहे. लोकांना जसेल सुटी दिवशी खेळ खेळायला आवडतात, तसेच मला रूग्णांची सेवा करत विकएंड घालवायला आवडतो.' अशी प्रतिक्रीया दिली. 

'आयुष्याच्या अखेरपर्यंत मला रूग्णांची सेवा करायची आहे. सध्या पंतप्रधानपजाची जबाबदारी असल्यामुळे रूग्णांना वेळ देता येत नाही. तरी मी त्यांच्यासाठी वेळ काढतो. रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करतो, तर आमच्या सरकारमध्ये धोरणांची तपासणी करून ती योग्यरित्या राबवण्याचे प्रयत्न करतो, असे शेरिंग यांनी सांगितले.

मागील वर्षी शेरिंग यांनी भूतानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. ते आठवड्यातला गुरूवार व शनिवार रूग्णांसाठी व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी देतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhutan Pm Lotay Tshering Works at hospital as doctor in 2 days of week