बिल गेट्स यांच्या राजीनाम्यामागे प्रेम प्रकरणाची चौकशी?

bill gates
bill gates
Summary

चौकशी सुरु असताना बिल गेट्स यांनी बोर्डाचे सदस्य म्हणून काम करणं हे कंपनीच्या नियमात बसत नसल्याचं बोर्डाने 2020 मध्ये म्हटलं होतं.

वॉशिंग्टन - मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) यांचे कंपनीतील महिला कर्मचाऱ्यासोबत प्रेमप्रकरण होतं याची माहिती आता समोर आली आहे. मात्र या प्रेमसंबंधांची चौकशी कंपनीकडून दोन वर्षापुर्वीच सुरू झाली होती. त्यानंतर चौकशी सुरु असताना बिल गेट्स यांनी बोर्डाचे सदस्य म्हणून काम करणं हे कंपनीच्या नियमात बसत नसल्याचं बोर्डाने 2020 मध्ये म्हटलं होतं. आता याबाबतचे वृत्त द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलं आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यासोबत असे संबंध ठेवणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचं बोर्डाने सांगितलं होतं. (bill gates quit board when microsoft investigated his affair wsj report)

बिल गेट्स यांच्यासोबत लैंगिक संबंध असल्याचा खळबळजनक दावा मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणाऱ्या एका महिला इंजिनिअरनं केला होता. त्यानंतर कंपनीने 2019 मध्ये या प्रकरणाची चौकशी एका कंपनीकडे सोपवली होती. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्याआधीच बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या बोर्ड सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं द वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

bill gates
'हमास' प्रमुखाच्या घरावर बॉम्ब हल्ले; इस्रायलची मोठी कारवाई!

महिला कर्मचाऱ्यासोबत गेट्स यांचे प्रेमसंबंध हे 20 वर्षांपूर्वी होते आणि ते कोणत्याही वादाशिवाय संपुष्टात आणले होते. बिल गेट्स यांनी पदाचा राजीनामा देण्याचा आणि या प्रकरणाचा काही संबंध नव्हता असं गेट्स यांच्या एका प्रवक्त्याने म्हटलं आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय हा सामाजिक कामाला वेळ देता यावा यासाठी घेतल्याचं बिल गेट्स यांनी सांगितलं आहे.

मायक्रोसॉफ्टने बिल गेट्स यांचे प्रेम प्रकरण आणि चौकशी याबाबत माहिती दिली आहे. एका मेलमध्ये मायक्रोसॉफ्टने असं म्हटलं की, बिल गेट्स यांच्या प्रेम प्रकरणाबाबत जेव्हा कंपनीला समजलं तेव्हा याबाबत चिंता वाटली होती. 2000 मध्ये हे प्रकरण समोर आलं होतं आणि कंपनीकडून याची चौकशीसुद्धा झाली. तसंच ही चौकशी सुरु असताना तक्रार करणाऱ्या महिलेला कंपनीकडून पुर्णपणे मदत करण्यात आली होती.

बिल गेट्स यांनी नुकतंच घटस्फोट घेतला. लग्नाला 27 वर्षे झाल्यानंतर गेट्स यांनी मेलिंडा यांच्याशी घटस्फोट घेताना दोघांनीही असं म्हटलं की, आता यापुढे आम्ही दोघे एकत्र राहू शकणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com