
अमेरिकेतील लसीकरण मोहिमेच्या संथगतीबद्धल नवे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर टीका केली आहे.
विलमिंग्टन- अमेरिकेतील लसीकरण मोहिमेच्या संथगतीबद्धल नवे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनावर टीका केली आहे. लसीकरणाचा वेग असाच राहिला तर सर्व नागरिकांपर्यंत लस पोचण्यासाठी बऱ्याच दिवसांचा कालावधी लागेल. परिणामी देशातील स्थिती आणखी बिघडू शकते. आगामी आठवडे आणि महिने हे देशासाठी खूप महत्त्वाचे असून हा काळ महासाथीतील सर्वात खडतर असेल, असे ते म्हणाले.
राज्यातील स्थिती धोकादायक, नागालँडमध्ये पुन्हा AFSPA लागू; केंद्राची घोषणा
अमेरिकेत कोविडमुळे ३,३६००० हून अधिक जणांचा मृत्यू झालेला असताना बायडेन यांनी मत मांडले आहे. आगामी काळ अमेरिकी नागरिकांसाठी आव्हानात्मक असून त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहवे, असे बायडेन यांनी आवाहन केले आहे. अमेरिकेतील स्थिती ढासळू शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. ट्रम्प प्रशासनाने या महिन्याच्या प्रारंभी वर्षाखेरीसपर्यंत दोन कोटी लोकांपर्यंत लस पोचेल, असे सांगितले होते. परंतु आतापर्यंत १ कोटी १४ लाख लशींचे वितरण करण्यात आले आहे. केवळ २१ लाख लोकांनाच पहिला डोस मिळाला आहे. त्यामुळे याच वेगाने लसीकरण सुरू राहिले तर सर्व अमेरिकी नागरिकांपर्यंत लस पोचण्यासाठी महिनेच नाही तर अनेक वर्षांचा कालावधी लागेल. बायडेन यांनी लसीकरणाची गती पाच ते सहा पटीने वाढवण्याचा संकल्प केला होता. परंतु संपूर्ण तयारी करुनही अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो, हे त्यांनी मान्य केले.
कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत सर्वाधिक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागलाय. एवढेच नाही तर अर्थव्यवस्थालाही मोठी झळ बसली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. कोरोनाच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्याच्या उद्देशाने अमेरिकन सरकारने विशेष पॅकजची घोषणा केली 900 बिलियन डॉलरच्या या पॅकेजच्या माध्यमातून नागरिकांना मदत दिली जाणार आहे.
राजीनाम्यानंतर मोफतमध्ये उपचार झाले नसते; मूड बदलल्यावर भाजप खासदाराचं वक्तव्य
अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक दणका बसल्यानंतर नागरिकांच्या हितासाठी काही निर्णय सरकार घेत असताना ट्रम्प यांनी आपला हट्टीपणा दाखवला होता. ट्रम्प आपल्या जबाबदाऱ्या सोडून गोल्फ खेळत ख्रिसमस साजरा करण्यात व्यस्त दिसले होते. सरकारी निधीवर स्वाक्षरी करायची सोडून ट्रम्प पाम बिचवर सुट्टीसाठी गेले होते.कोरोनाच्या संकटात दिल्या जाणाऱ्या मदतीला रोखण्याचा या प्रकारावरुन चौहू बाजूंनी त्यांच्यावर टीकाही झाली होती.