esakal | ट्विटर हॅक करुन, 17 वर्षांच्या पोरानं एका दिवसांत कमावले 1 लाख डॉलर
sakal

बोलून बातमी शोधा

hacking Tweeter accounts

या प्रकरणात दिग्गज व्यक्तींची अकाउंट हॅक करण्यात आली असली तरी त्याचा मुख्य हेतू हा सामान्य लोकांच्या खिशातील पैशावर डल्ला मारण्याचा होता.

ट्विटर हॅक करुन, 17 वर्षांच्या पोरानं एका दिवसांत कमावले 1 लाख डॉलर

sakal_logo
By
सुशांत जाधव

बिल गेट्स, इलॉन मस्क, कान्ये वेस्ट, बराक ओबामा आणि जो बायडेन यासारख्या लोकप्रिय व्यक्तींची ट्विटर अकाउंट्स हॅक करुन ट्विटरसह जगाला हादरवून सोडणाऱ्या हॅकर्सला अखेर अटक करण्यात आले आहे. ऑनलाइन जगतातील सर्वात मोठा घोटाळा संबोधण्यात येत असलेल्या या प्रकरणाचा सूत्रधार हा फ्लोरिडामधील 17 वर्षांचा एक मुलगा आहे. त्याच्यावर 30 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमेरिकेतील फेडरेअल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने या प्रकरणात कसून चौकशी सुरु केली होती. अखेर यातील आरोपींना पकडण्यात यश आले आहे. 

अयोध्येत लॉकडाउनजन्य परिस्थिती; बाहेरच्यांना प्रवेशबंदी​

फ्लोरिडाच्या टेंपा येथील रहिवाशी असलेल्या मुलाविरोधात संस्थागत फसवणूक आणि हॅकिंगयासह अन्य काही गुन्हे नोंदवण्यात आले आहे. हिल्सबरो स्टेट अटर्नी ऐंड्रू वॉरन यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, 17 वर्षांचा मुलगाच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार होता, अशी माहिती दिली आहे. संबंधित मुलाने दिग्गजांची ट्विटर हॅक करुन बिटकॉइनच्या स्वरुपात 1 दिवसांत 1 लाख डॉलरची कमाई केली, अशी माहितीही त्यांनी दिली. 

अमेरिकेच्या इतिहासात जे घडलं नाही त्यासाठी ट्रम्प यांचा हट्ट

या प्रकरणात दिग्गज व्यक्तींची अकाउंट हॅक करण्यात आली असली तरी त्याचा मुख्य हेतू हा सामान्य लोकांच्या खिशातील पैशावर डल्ला मारण्याचा होता. 17 वर्षीय मुलासह ब्रिटनच्या 19 वर्षीय जॉन शेपर्ड आणि ओरलँडोच्या नामा फजेली यांना देखील याप्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती वॉरन यांनी दिली. या दोघांनी मुख्य आरोपीला मदत केली होती.  क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलन ट्रान्सफर मॉनिटर करणाऱ्या Blockchain.com ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपींनी सांगितलेल्या इमेलवर जवळपास 12.58 बिटकॉइन पाठवण्यात आले. त्याचे मूल्य 1,16,000 डॉलर ( जवळपास 87.2 लाख रुपये) इतके होते. हॅक करण्यात आलेल्या प्रत्येक ट्विटर अकाउंटवरुन हॅकर्संनी एक संदेश पाठवला होता. फॉलो करणाऱ्यांना दुप्पट बिटकॉइन्स देण्यात येतील, अशी ऑफर देत बिटकॉइन्सची मागणी केली होती.